रेसिपी शोधा

खोब्रा बेसन बर्फी - Coconut besan barfi

खोब्रा बेसन बर्फी - Coconut besan barfi

साहित्य :
 • बेसन - १०० ग्राम 
 • साखर - ५०० ग्राम 
 • खोबरे - २०० ग्राम ( बारीक किसलेले )
 • छोटी वेलची - ५ ते ६ (कुटून बारीक पावडर केलेली )
 • तूप - २०० ग्राम 
 • दुध - १ कप 
 • काजू - ५० ग्राम ( छोटे छोटे तुकडे केलेले)
 • मीठ - चिमुटभर 
कृती :
 • एका कढइत तूप टाका, तूप गरम झालेकी बेसन निरंतर ढवळीत थोडा तपकिरी रंग येईपर्यंत भाजून बाजूला ठेवा . 
 • आता त्याच कढईत खोबरे थोडे परतून घ्या व बाजूला ठेवा . 
 • एका पातेल्यामध्ये साखर आणि दुध टाकून पाक बनवायला ठेवा . दोन तारी पाक तयार झाला कि त्यात बेसन , खोबरे, वेलची पावडर, काजू आणि थोडे मीठ टाका . व चांगले मिक्स करून घ्या . 
 • दरम्यान एका प्लेटला थोडे तूप लाऊन तयार ठेवा . तयार मिश्रण त्या प्लेटमध्ये टाका व व्यवस्थित पसरून घ्या . व थंड व्हायला ठेवा 
 • बर्फी थंड झाली कि चाकूने हव्या त्या आकारात कापून घ्या . 

Popular Posts

हॅप्पी भाग जएजी हिंदी फिल्म