बटर चिकन - Butter Chicken
साहित्य :
- चिकन - ५०० ग्राम (मध्यम काप केलेले)
- अद्रक लसूण ची पेस्ट - २ छोटे चमचे
- टोमॅटो - ५०० ग्राम (मध्यम काप केलेले )
- कांदे - २ मध्यम आकाराचे ( बारीक काप केलेले )
- लाल तिखट - २ ते ३ छोटे चमचे ( किंवा आवश्यकतेनुसार )
- तेल - १/२ कप
- कस्तुरी मेथी - १ छोटा चमचा
- कोथिंबीर - १/२ कप
- क्रीम - १/२ कप
- लोणी - १ कप
- गरम मसाला - १ छोटा चमचा
- पाणी - २ कप
- मीठ - चवीपुरते
कृती :
- एका पातेल्यात चिकनचे तुकडे घ्या . त्यात १ चमचा अद्रक लसूणची पेस्ट, १ चमचा लाल तिखट आणि थोडे मीठ टाका व चांगले मिक्स करून अर्ध्या तासाकरिता बाजूला ठेवा .
- अर्ध्या तासांनंतर ग्यासवर पॅन ठेवा पॅन गरम झाला की त्यात थोडे तेल टाकून चिकनला जरा परतून घ्या . व काढून बाजूला ठेवा .
- त्याच पॅन मध्ये थोडे तेल टाका , व कापलेले कांदे आणि एक चमचा लोणी टाकून कांदे हलके सोनेरी होईपर्यंत परता .
- आता त्यात टोमॅटो , गरम मसाला , लाल तिखट , अद्रक लसूण ची पेस्ट व मीठ टाका. सर्व चांगले मिक्स करून घ्या.
- आता मिश्रणात पाणी टाकून १० ते १५ मिनटे शिजू घ्या . टोमॅटो चांगले नरम झाले की मिश्रणाला एक पातेल्यात काढून घ्या .
- मिक्सर ग्रॅन्डरने वा हॅन्ड मिक्सरने मिश्रणाची पेस्ट करा .
- आता त्याच पॅन मध्ये तयार मिश्रण चाळणीने गाळून घ्या . आणखी एकदा गरम करायला ठेवा .
- त्यात उरलेले लोणी , थोडी क्रीम आणि चिकन टाकून मिक्स करा व १० मिनिटनकरिता पकवा .
- तुमचे बटर चिकन तयार आहे , थोडी क्रीम, थोडी कोथिंबीर आणि कापलेले कांदे टाकून सजवा . हे तुम्ही तवा नाणं अथवा पळी सोबत सर्व करू शकता .