साहित्य :
- दूध - ३ लिटर
- काजू - ५० ग्राम (बारीक तुकडे केलेले )
- साखर - ३०० ग्राम
- निंबू रस - २ छोटे चमचे
- वेलची पावडर - २ छोटे चमचे (५ ते ६ वेलची बारीक कुटलेली)
- तूप - १ छोटा चमचा
कृती :
- सर्वप्रथम एका मोठ्या पातेल्यात दूध आटवायला ठेवा व मधून मधून हलवीत रहा . दूध जवळ जवळ १/४ राहील एवढे आटऊन घट्ट करा .
- आता त्यात निंबू रस टाकून आणखी थोड्या वेळ हलवीत घट्ट करा.
- दूध चांगले घट्ट झालेकी त्यात साखर टाकून मिक्स करा व दूध चांगले जमेल असे होईपर्यंत आणखी शिजवा . मिश्रण चांगले हलवीत रहा जेणेकरून ते खाली पातेल्याला लागू नये .
- आता त्यात वेलची पावडर आणि काजूचे तुकडे टाका एकदम मंद आचेवर थोड्यावेळ शिजवा .
- दरम्यान एका छोटया पातेल्याला आतून तूप लावा .
- आता तयार मिश्रण पातेल्यात टाका व चांगले भरून अर्ध्या तासाकरिता बाजूला ठेवा .
- आता पातेल्याच्या कडा चाकूच्या मदतीने मोकळ्या करा व पातेलं प्लेटमध्ये पालटे करून हाताने थोडी थाप देऊन केक मोकळा करा .
- तुमचा मिल्क केक तयार आहे. आता त्याचे हव्या त्या आकाराचे काप करून वेगळे करा .
साहित्य :
- पुदिना - २०० ग्राम
- हिरवी मिरची - २ ते ३ (बारीक कापलेली )
- कांदा - १ छोटा (बारीक काप करून जरा परतून घेतलेला )
- जिरे - २ छोटे चमचे (भाजलेले )
- दही - १ कप
- गूळ किंवा साखर - १ छोटा चमचा
- मीठ - स्वादानुसार
कृती :
- सर्वप्रथम पुदिन्याच्या पानांना चांगले धुऊन घ्या .
- आता दही सोडून सर्व मिश्रण मिक्सर ग्राइंडर मध्ये बारीक करून घ्या
- आता त्यात दही टाकून चांगले मिक्स करा .
- तुमची पुदिन्याची चटणी तयार आहे . तुम्ही हिला गरमा गरम समोस्या सोबर सर्व करू शकता .
साहित्य :
- गव्हाचे पीठ - ५०० ग्राम
- मुळा - १ १/२ कप (बारीक किसलेला )
- लाल तिखट - २ छोटे चमचे
- हळद - १ छोटा चमचा
- आले पेस्ट - २ चमचे
- ओवा - १ छोटा चमचा
- हिरवी मिरची - २ ते ३ (बारीक चिरलेली )
- कोथिंबीर - १/२ कप (बारीक चिरलेली )
- तेल - १ कप
- मीठ - चवीनुसार
कृती :
- एका भांड्यात गव्हाचे पीठ घ्या . त्यात किसलेला मुळा , दोन चमचे तेल, ओवा , हिरवी मिरची , आले पेस्ट , लाल तिकट , हळद, कोथिंबीर आणि मीठ टाकून थोडे थोडे पाणी टाकीत घट्ट असे मळा . व जवळ जवळ १० ते २० मिनिटांकरिता बाजूला ठेवा .
- आता तयार कणकेचा एक गोळा घेऊन पोळी लाटायला घ्या . थोडे तेल लाऊन पोळीला पलटा व पुन्हा तेल लावून पलटवीत त्रिकोणी आकाराची पोळी तयार करा . व थोडी लटा
- ग्यासवर पॅन ठेवा थोडे तेल टाका तेल गरम झालेकी तयार पोळी त्यावर टाका व हलका तांबडा रंग झालाकी पलटा व दोन्ही बाजूने चांगले शेकून घ्या .
- तुमचे मुळ्याचे पराठे तयार आहेत , याना गरमा गरम सर्व करा .
साहित्य :
- डार्क चॉकलेट (डार्क कंपाउंड) - ५००ग्राम
- व्हाईट चॉकलेट (व्हाईट कंपाउंड ) - २०० ग्राम
- काजू - ५० ग्राम
- बदाम - ५० ग्राम
कृती :
- डार्क आणि व्हाईट चॉकलेटचे चाकूच्या मदतीने बारीक तुकडे करून घ्या.
- एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवा पाणी थोडे गरम झालेकी ग्यास एकदम मंद करून घ्या .
- एका दुसऱ्या पातेल्यात दोन्ही चॉकलेट टाकून ते पातेलं गरम पाण्यात ठेवा .
- चमच्याने निरंतर हलवीत रहा . चॉकलेट वितळायला लागेल , चॉकलेट पूर्ण वितळून झाले कि पातेलं पाण्याच्या बाहेर काढा .
- दरम्यान काजू व बदाम थोडे पॅन मध्ये भाजून घ्या जेणेकरून त्यातली नमी निघून जाईल
- चॉकलेटच्या साच्यामध्ये एक एक काजू ठेऊन चमच्याने चॉकलेट त्यात टाका व सर्व साचे भरून झालेकी साच्याला थोडे हलवा जेणेकरून चॉकलेट समांतर रीतीने साच्यामध्ये बसेल
- चॉकलेट जमल्यानंतर एक एक चॉक्लेटला बाहेर काढा व चॉकलेट पेपर ने सजवा
साहित्य :
- बटाटे - २५० ग्राम (उकळून साल काढलेले)
- पोहा - १ कप
- हिरवी मिरची - २ ते ३ ( बारीक चिरलेली )
- ब्रेड - २
- मैदा - २ मोठे चमचे
- आले - १ छोटा तुकडा (पेस्ट केलेले )
- कोथिंबीर - १/२ कप (बारीक चिरलेली )
- तेल - फ्राय करण्याकरिता
- मीठ - चवीनुसार
कृती
- एका छोट्या प्याल्यात मैदा घ्या त्यात २ ते तीन चमचे पाणी व थोडे मीठ टाकून पातळ ,मिश्रण तयार करून बाजूला ठेवा .
- पोहे पाण्याने धुऊन फुलण्याकरिता बाजूला ठेवा .
- आता ब्रेडला मिक्सरमध्ये बारीक पावडर करून एखाद प्लेटमध्ये काढून घ्या .
- एका भांड्यात बटाटे घेऊन कुस्करून घ्या . त्यात पोहे , हिरवीमिरची , आले , कोथिंबीर व मीठ टाकून चांगले मिक्स करा
- तयार मिश्रणाचे हव्या त्या आकाराचे गोळे बनऊन हाताच्या मदतीने मध्य भागी दाब देत वडे तयार करून बाजूला ठेवा
- एका पॅनला ग्यासवर ठेऊन थोडे तेल टाका, तेल गरम झाले कि, एक कटलेट उचलून मैदयाच्या मिश्रणात बुडून ब्रेडच्या चुऱ्यात टाका व दोन्ही बाजूने ब्रेडचा चुरा लावून पॅन मध्ये हलका तपकिरी रंग होईपर्यंत दोन्हीबाजूने तळा .
- तुमचे बटाटा कटलेट तयार आहेत .
साहित्य :
- रवा - ५०० ग्राम
- साखर - ३ कप
- काजू - ५० ग्राम
- मनुका - ५० ग्राम
- खोबरे - १/२ कप (किसलेले )
- तूप - २०० ग्राम
कृती :
- सर्वप्रथम ग्यासवर पॅन ठेऊन तूप टाका, तूप गरम झालेकी रवा टाकून हलका तांबडा रंग होईपर्यंत परता .
- आता एका भांड्यात एक कप पाणी घ्या व त्यात साखर टाकून चाचणी बनवायला ठेवा .
- चाचणी दोन तरी झालीकी तिला भाजलेल्या रव्यामध्ये टाका खोबरे व काजू टाकून चांगले मिक्स करून घ्या .
- थोडे तूप हतला लावून मिश्रणाचा थोडासा भाग घेऊन हव्या त्या आकाराचे लाडू बनवायला घ्या .
- वरून सजावटीसाठी एक एक मनुका प्रत्येक लाडवावरती लावा
- तुमचे रव्याचे लाडू तयार आहे .
साहित्य :
- उडदाची डाळ - १/२ कप
- साखर - ४ कप
- मैदा - २०० ग्राम
- काजू - ५० ग्राम (तुकडे केलेले)
- केसर - ६ ते ७ धागे ( थोड्या गरम दुधामध्ये थोडया वेळ भिजवलेले )
- वेलची - ४ ते ५ (कुटून पूड केलेली )
- तेल - तळण्याकरिता
कृती :
- सर्वप्रथम उडदाच्या डाळीला चांगली धुऊन २ ते ३ तासांकरिता पाण्यात भिजत ठेवा . नंतर पूर्ण पाणी काढून घ्या .
- आता तयार डाळीला मिक्सरमध्ये चांगली बारीक करून घ्या .
- आता एका पातेल्यात १ १/२ कप पाणी टाका आणि त्यात साखर टाकून चाचणी बनवायला ठेवा .
- दरम्यान एका भांड्यात बारीक केलेली डाळ च्या , त्यात मैदा टाका व केसचे दूध टाकून फेटा .
- थोडे थोडे पाणी टाकीत सर्व गाठी काढीत मिश्रण चांगले ढवळून घ्या . मिश्रण खूप जास्ती पातळ किंवा घट्ट होता काम नये .
- तयार चाचणीला चमच्याने ढवळीत बुडविलेला चमचा थोडा वर उचला आणि पडणाऱ्या थेंबाचा तार तुटतोय कि नाही हे चेक करा . व तयार चाचणीला ग्यासच्या खाली उतरून ठेवा . चाचणी थोडी गरमच राहील याची काळजी घ्या .
- आता पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवा . तेल चांगले गरम झाले कि एकाद्या झारीला पॅनवर उलटे पकडून थोडे थोडे मिश्रण हाताने झर्यावरती पसरवीत तेलात बुंदी तळा.
- बुंदी हलकी सोनेरी झालीकी गरम गरमच तेलातून काढून चाचणीत टाका व ५ ते ६ मिनिटे ठेवा व एखाद प्लेटमध्ये काढून थंड होऊ द्या .
- काजूचे तुकडे बुंदी गरम असतांनाच टाकून मिक्स करून घ्या .
- तुमची प्रसादाची बुंदी तयार आहे .