रेसिपी शोधा

सांबर - Sambar Recipe

सांबर - Sambar Recipe
NEW BOLLYWOOD MOVIE



साहित्य :
  • तुळीची डाळ - २५० ग्राम 
  • लाल तिखट - १ छोटा चमचा 
  • हिंग- १ छोटा चमचा 
  • हळद - १ छोटा चमचा 
  • कोथिंबीर - १/२ कप (बारीक चिरलेली)
  • चिंचेचा गर - ५० ग्राम 
  • टोमॅटो - २ (बारीक काप केलेले)
  • बटाटे - २ (बारीक काप केलेले)
  • कांदा - १ (बारीक चिरलेला)
  • वांग - १ ते २ (बारीक केलेलं)
  • तेल - २ ते ३ छोटे चमचे 
  • शेवग्याच्या शेंगा - १ ते २ ( तुकडे केलेल्या )
  • लाल मिरची - २ ते ३
  • राई - १ छोटा चमचा 
  • लसूण - १ ते पाकळ्या ( बारीक काप केलेला )
  • कढीपत्ता - ५ ते ६
  • मीठ - चवीपुरते 
कृती :
  • सर्वप्रथम तुळीच्या डाळीला चांगली धुऊन प्रेशर कुकर मध्ये २ ते ३ कप पाणी टाकून शिजून घ्या. 
  • दरम्यान एका प्याल्यात थोडे गरम पाणी घेऊन चिंच जवळ जवळ अर्ध्या तासाकरिता भिजत ठेवा . 
  • आता त्यात टोमॅटो, बटाटे, कांदा , शेवग्याच्या शेंगा , वांग टाकून आणखी एखाद सिटी होऊ घ्या . 
  • आता त्यात थोडे पाणी आणि चिंचेचा गर टाकून मधून मधून ढवळीत १५ मिनिटे मंद आचेवर शिजू घ्या . 
  • फोडणी देण्यासाठी एका पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवा . त्यात मोहरी टाकून जरा परता , त्यात लसूण , लाल मिरची , कढीपत्ता व हिंग टाकून लसूण हलका सोनेरी होईपर्यंत आणखी थोड्या वेळ परता . 
  • आता त्यात तयार डाळीचे मिश्रण टाकून ५ मिनिटे उकळवा . 
  • तुमचा गरमा गरम सांबर तयार आहे . वरण थोडी कोथिंबीर टाकून सजवा . 

Popular Posts

हॅप्पी भाग जएजी हिंदी फिल्म