1 कप ज्वारीचे पीठ
1/2 कप गव्हाचे पीठ
१/२ कप ह. डाळीचे पीठ
१/२ कप ह. डाळीचे पीठ
1-2 टिस्पून. हिरवी मिरची,
6-7 लसूण पाकळ्या
1/4 कप चिरलेली कोथिंबीर
1/4 टिस्पून . हळद
1/4 टिस्पून . जिरे.
मीठ चवीनुसार
तेल आवश्यकत्तेनुसार
कृती -
- हिरवी मिरची आणि लसूण पेस्ट बनवा .
- एक ताटात ज्वारीचे पीठ, गव्हाचे पीठ, ह. डाळीचे पीठ घ्या त्यात
- मिरची आणि लसूण पेस्ट, हळद, जिरे , गरम मसाला, कोथिंबीर आणि मीठ घाला
- नंतर सर्व एकत्र करून त्यात थोड़े थोड़े पानी घालून हाताने चांगले मळुन घ्या
- मळलेल्या पीठाचे लहान लहान गोळे करून घ्या .
- प्लास्टिक चा कागद किंवा सुती जाड कपडा घेऊन त्याला थोडे पाणी लाऊन त्याचाय्वर तो पिठाचा गोळा ठेऊन बोटांच्या मदतीने थापून गोल आकार द्या, पण त्याच्या कडा तुटल्या जाणार नाही याची दक्षता घ्या . एका बोटाने मध्यभागी लहानशे छिद्रे पाडून घ्या .
- एका फ्रायपॅन किंवा तवा घेऊन तो गरम झाल्यावर, त्यावर थोडे तेल पसरून घ्या .
- नंतर त्या कपड्याचे दोन्ही टोक पकडून ती धपाट तव्यावर अलगत सोडा. हे करत असतांना धपाट तुटणार नाही याची काळजी घ्या .
- आता थोडे चमच्याने धपाटयाच्या छिद्रांमध्ये थोडे आणि सभोवताली तेल सोडा . आणि मधम आचेवर धपाट एका बाजूने भाजू द्या, व काही वेळानी पालटून दुसरी बाजू भाजू द्या .
- तयार झालेल्या गरम गरम धपाटयाचा आस्वाद घ्या .