तिळाचे लाडु - Tilache Ladoo
साहित्य :
साहित्य :
- तीळ - २५० ग्राम
- शेंगदाणे - २०० ग्राम
- गुळ - २५० ग्राम
कृती :
- सर्वप्रथम तीळ एका कढईत थोडी तपकिरी होईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्या . व बाजूला काढून ठेवा . आता त्याच कढईत शेंगदाणे भाजायला घ्या थोडे गर्द रंग झाला कि ग्यास बंद करा व थंड होऊ द्या .
- दरम्यान तीळ एखाद्या खलात थोडी कुटून घ्या व बाजूला काढून ठेवा . शेंगदाणे थंड झाले कि त्यांचे साल कडून शेंगदाणे वेगळे करा . व तेही खलात थोडे मध्यम कुटून घ्या . व बाजूला काढून ठेवा .
- आता गुळ सुद्धा खालामध्ये बारीक करा .
- एका भांड्यामध्ये सर्व मिश्रण म्हणजे तीळ , शेंगदाणे व गुळ टाकून चांगले मिक्स करा . आता त्या मिश्रणाचा थोडासा भाग हातात घेऊन लाडू बनवायला घ्या .
- तुमचे तिळाचे लाडू तयार आहेत , सर्व साहित्य खालत बारीक केल्यामुळे लाडवांना एक वेगळीच चव येते .