गाजर बर्फी - Carrot Burfi Recipe
साहित्य :
साहित्य :
- गाजर - ५०० ग्राम
- क्रीम दुध - १ लिटर
- वेलची - ५ ते ६ ( कुटून बारीक पावडर केलेली )
- तूप - १०० ग्राम
- साखर - २५० ग्राम किवा आव्श्क्तेनुसार
- काजू - ५० ग्राम ( तुकडे केलेले )
कृती :
- सर्वप्रथम गाजर चांगले धून घेऊन बारीक किस करून घ्या .
- एका भांड्यात दुध गरम करायला ठेवा दुध गरम झाले कि त्यात गाजर टाका व दुध पूर्णतः आटे पर्यंत शिजू द्या . मधन मधन ढवळत चला जेणेकरून गाजर खाली लागणार नाही .
- गाजर मिश्रण चांगले घट्ट झालेकी त्यात वेलची पावडर, निम्मे काजू व तूप टाकून निरंतर ढवळीत थोड्यावेळ सिजु द्या .
- आता त्यात साखर टाका व चांगले मिक्स करा . साखरेचे पाणी पूर्ण आटेपर्यंत मिश्रणाला निरंतर ढवळीत राहा .
- दरम्यान एका प्लेटला थोडे तूप लाऊन गुळगुळीत करा . मिश्रण चांगले घट्ट झालेकी ते या प्लेटमध्ये पसरवा व उरलेल्या काजूच्या तुकड्यांनी सजवा . व थंड व्ह्यायला बाजूला ठेवा .
- मिश्रण थंड झाले कि चाकूच्या मदतीने हव्या त्या आकाराचे काप करून वेगळे करा .
- तुमची गाजर बर्फी तयार आहे .