कैरीचे लोणचे - Kairiche (Aamba) Lonche
साहित्य :
- कच्च्या कैऱ्या (आंबे) - १ किलो
- हिंग पावडर - १/२ छोटा चमचा
- हळद - ५० ग्राम
- लाल तिखट - ५० ग्राम (किंवा आव्श्क्तेनुसार )
- मोहरीची डाळ - ५० ग्राम
- सोप - २ मोठी चमचे
- सरसो तेल - २०० ग्राम
- मीठ - १०० ग्राम (किंवा आव्श्क्तेनुसार )
कृती :
- सर्व प्रथम कैर्या चांगल्या पाण्याने धूऊन घ्या व एका भांड्यात त्या पूर्ण दुबेल येवढे पाणी टाकून जवळ जवळ एक रात्र बाजूला ठेवा .
- आता कैऱ्या पाण्याच्या बाहेर काढून जरा सुकून घ्या . व चाकूने हव्या त्या आकाराचे काप करून घ्या .
- कढईत तेल गरम करायाला ठेवा . तेल गरम झालेकी ग्यास बंद करा व त्यात मोहरीची डाळ , हळद , लाल तिखट , हिंग , मीठ आणि काप केलेल्या कैऱ्या टाकून चांगले चमच्याने ढवळून घ्या . व थोड्या वेळा करिता झाकून बाजूला ठेवा .
- आता तयार लोणच्याला काचेच्या बरणीत भरून जवळ जवळ एका आठोड्या करिता उनेम्ध्ये ठेवा . मधून मधून चमच्याने लोणचे खालीवर करीत चला .
- तुमचे कैरीचे लोणचे तयार आहे .