साहित्य :
- बटाटे - २५० ग्राम (उकळून साल काढलेले)
- पोहा - १ कप
- हिरवी मिरची - २ ते ३ ( बारीक चिरलेली )
- ब्रेड - २
- मैदा - २ मोठे चमचे
- आले - १ छोटा तुकडा (पेस्ट केलेले )
- कोथिंबीर - १/२ कप (बारीक चिरलेली )
- तेल - फ्राय करण्याकरिता
- मीठ - चवीनुसार
कृती
- एका छोट्या प्याल्यात मैदा घ्या त्यात २ ते तीन चमचे पाणी व थोडे मीठ टाकून पातळ ,मिश्रण तयार करून बाजूला ठेवा .
- पोहे पाण्याने धुऊन फुलण्याकरिता बाजूला ठेवा .
- आता ब्रेडला मिक्सरमध्ये बारीक पावडर करून एखाद प्लेटमध्ये काढून घ्या .
- एका भांड्यात बटाटे घेऊन कुस्करून घ्या . त्यात पोहे , हिरवीमिरची , आले , कोथिंबीर व मीठ टाकून चांगले मिक्स करा
- तयार मिश्रणाचे हव्या त्या आकाराचे गोळे बनऊन हाताच्या मदतीने मध्य भागी दाब देत वडे तयार करून बाजूला ठेवा
- एका पॅनला ग्यासवर ठेऊन थोडे तेल टाका, तेल गरम झाले कि, एक कटलेट उचलून मैदयाच्या मिश्रणात बुडून ब्रेडच्या चुऱ्यात टाका व दोन्ही बाजूने ब्रेडचा चुरा लावून पॅन मध्ये हलका तपकिरी रंग होईपर्यंत दोन्हीबाजूने तळा .
- तुमचे बटाटा कटलेट तयार आहेत .