मुगडाळीचे लाडू - mugachya daliche ladoo
साहित्य :
साहित्य :
- मुगडाळ - २५० ग्राम
- साखर - २५० ते ३०० ग्राम (किंवा आवशकतेनुसार ) वाटून बारीक केलेली
- तूप - २०० ग्राम
- बदाम - ५० ग्राम ( कुटून बारीक केलेली)
- काजू - ५० ग्राम ( लहान लहान तुकडे केलेले )
- वेलची - ६ ते ७ ( कुटून बारीक पावडर केलेली )
कृती :
- सर्वप्रथम डाळीला एका भांड्यामध्ये घ्या व डाळ पूर्ण डुबेल येवढे पाणी टाकून ५ तासाकरित भिजत ठेवा . नंतर डाळीला पाण्यातून काढून स्वच्छ धून घ्या व सर्व पाणी काढून मिक्सर मधून थोडी जाडसर बारीक करून घ्या.
- आता एका प्यान मध्ये तूप गरम करायला ठेवा , तूप थोडे गरम झाले कि त्यात डाळ टाका व चमच्याने निरंतर ढवळीत मध्यम आचेवर जवळ जवळ ३० मिनिटे भाजा . हळू हळू डाळीचा रंग बदलू लागतो . रंग थोडा तपकिरी झाला कि ग्यास बंद करा . व थंड व्हायला बाजूला ठेवा .
- आता थंड झालेल्या मिश्रणात साखर, बदाम , काजू आणि वेलची पावडर टाकून चांगले मिक्स करा .
- आता थोडे मिश्रण हातात घेऊन लाडू बनवायला घ्या . व एका प्लेटमध्ये जमा करा