सोल कढी - Sol Kadhi
साहित्य :
साहित्य :
- कोकम - ४ ते ५
- हिंग - १/४ छोटा चमचा
- नारळाचे दुध - १ कप
- हिरवी मिरची - आव्श्क्तेनुसार
- कोथिंबीर - थोडासा ( बारीक चिरलेला )
- मीठ - आव्श्क्तेनुसार
कृती :
- सर्वप्रथम जवळ जवळ एक कप पाणी गरम करायला ठेवा , पाणी गरम झाले कि त्यात कोकम टाकून १ तासाकरिता बाजूला ठेवा . नंतर कोकम चांगले निथळून बाहेर काढा. व तयार मिश्रणात थोडा हिंग व बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून चांगले ढवळा.
- आता त्यात नारळाचे दुध आणि आव्श्क्तेनुसार मीठ टाका व थोडी कोथिम्बिर टाकून सजवा .
- तुमची सोल कढि तयार आहे .