रेसिपी शोधा

दही वडे - Dahi Wade

दही वडे - Dahi Wade
NEW BOLLYWOOD MOVIE



साहित्य :
  • उडदाची डाळ - २ कप (२५० ग्राम )
  • दही - ५०० ग्राम 
  • जिरेपूड - २ छोटे चमचे 
  • अद्रक पेस्ट - १ छोटा चमचा 
  • धणेपूड - १ छोटा चमचा 
  • मोथिंबीर - १/२ कप ( बारीक कापलेली )
  • हिरवी मिरची - २ (बारीक कापलेली )
  • हिंग - १ छोटा चमचा 
  • चाट मसाला - १ छोटा चमचा'
  • लाल तिखट - १ छोटा चमचा ( किंवा चवीनुसार )
  • तेल - तळण्यापुरते 
  • काळे मीठ किंवा साधे मीठ - चवीपुरते 
कृती :
  • सर्वप्रथम उडद डाळ चांगली धुऊन ४ ते ५ तासांकरिता पाण्यामध्ये भिजत ठेवा . 
  • नंतर सर्व पाणी काढून घेऊन हलकी जाडसर मिक्सर मध्ये (पाणी न टाकता किंवा किंचित पाणी टाकून) बारीक करून घ्या . 
  • तयार डाळीच्या पेस्टला चमच्याने चांगले फेटा जेणेकरून ती एकजीव होईल . 
  • आता त्यात हिंग, अद्रक ची पेस्ट, हिरवी मिरची आणि थोडे मीठ टाकून मिक्स करा . 
  • पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवा ,तेल गरम झालेकी तयार मिश्रणाचे हव्या त्या आकाराचे गोळे करून तेलात सोडा. व हलका सोनेरी रंग होईपर्यंत दोन्ही बाजूने तळा . 
  • तळलेले वडे एका प्लेटमध्ये काढून थोडे थंड होऊ द्या . 
  • वडे थंड जाहलेकी त्यांना एका भांड्यात पूर्ण वडे दुबेल असे पाणी घ्या व त्यात थोडे मीठ टाका . 
  • आता सर्व वडे त्यात टाका व १५ ते २० मिनिटे बाजूला ठेवा .
  • नंरत एक एक वड्याला हाताने हलके दाबीत त्यातले पाणी काढीत प्लेटमध्ये ठेवा . 
  • एक दोन वडे छोट्या प्लेटमध्ये घेऊन त्यावर दही टाका . थोडे जिरेपूड , धणेपूड, लाल तिखट , चाटमसाला ,काळे मीठ, आणि थोडी कोथिंबीर टाकून सर्व करा. 

Popular Posts

हॅप्पी भाग जएजी हिंदी फिल्म