रेसिपी शोधा

रवा लाडू - Rva Ladoo

रवा लाडू - Rva Ladoo
NEW BOLLYWOOD MOVIE



साहित्य :
  • रवा - ५०० ग्राम 
  • साखर - ३ कप 
  • काजू - ५० ग्राम 
  • मनुका - ५० ग्राम 
  • खोबरे - १/२ कप (किसलेले )
  • तूप - २०० ग्राम 
कृती :
  • सर्वप्रथम ग्यासवर पॅन ठेऊन तूप टाका, तूप गरम झालेकी रवा टाकून हलका तांबडा रंग होईपर्यंत परता .
  • आता एका भांड्यात एक कप पाणी घ्या व त्यात साखर टाकून चाचणी बनवायला ठेवा . 
  • चाचणी दोन तरी झालीकी तिला भाजलेल्या रव्यामध्ये टाका खोबरे व काजू टाकून चांगले मिक्स करून घ्या . 
  • थोडे तूप हतला लावून मिश्रणाचा थोडासा भाग घेऊन हव्या त्या आकाराचे लाडू बनवायला घ्या . 
  • वरून सजावटीसाठी एक एक मनुका प्रत्येक लाडवावरती लावा 
  • तुमचे रव्याचे लाडू तयार आहे . 

प्रसादाची बुंदी - Prasad Boondi

प्रसादाची बुंदी - Prasad Boondi
NEW BOLLYWOOD MOVIE



साहित्य :
  • उडदाची डाळ - १/२ कप 
  • साखर - ४ कप 
  • मैदा - २०० ग्राम 
  • काजू - ५० ग्राम (तुकडे केलेले)
  • केसर - ६ ते ७ धागे ( थोड्या गरम दुधामध्ये थोडया वेळ भिजवलेले )
  • वेलची - ४ ते ५ (कुटून पूड केलेली )
  • तेल - तळण्याकरिता 
कृती :
  • सर्वप्रथम उडदाच्या डाळीला चांगली धुऊन २ ते ३ तासांकरिता पाण्यात भिजत ठेवा . नंतर पूर्ण पाणी काढून घ्या . 
  • आता तयार डाळीला मिक्सरमध्ये चांगली बारीक करून घ्या . 
  • आता एका पातेल्यात १  १/२ कप पाणी टाका आणि त्यात साखर टाकून चाचणी बनवायला ठेवा . 
  • दरम्यान एका भांड्यात बारीक केलेली डाळ च्या , त्यात मैदा टाका व केसचे दूध टाकून फेटा . 
  • थोडे थोडे पाणी टाकीत सर्व गाठी काढीत मिश्रण चांगले ढवळून घ्या . मिश्रण खूप जास्ती पातळ किंवा घट्ट होता काम नये . 
  • तयार चाचणीला चमच्याने ढवळीत बुडविलेला चमचा थोडा वर उचला आणि पडणाऱ्या थेंबाचा तार तुटतोय कि नाही हे चेक करा . व तयार चाचणीला ग्यासच्या खाली उतरून ठेवा . चाचणी थोडी गरमच राहील याची काळजी घ्या . 
  • आता पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवा . तेल चांगले गरम झाले कि एकाद्या झारीला पॅनवर उलटे पकडून थोडे थोडे मिश्रण हाताने झर्यावरती पसरवीत तेलात बुंदी तळा. 
  • बुंदी हलकी सोनेरी झालीकी गरम गरमच तेलातून काढून चाचणीत टाका व ५ ते ६ मिनिटे ठेवा व एखाद प्लेटमध्ये काढून थंड होऊ द्या . 
  • काजूचे तुकडे बुंदी गरम असतांनाच टाकून मिक्स करून घ्या . 
  • तुमची प्रसादाची बुंदी तयार आहे . 

कच्या केळांचा शिरा - Kchya Kelancha Shira

कच्या केळांचा शिरा - Kchya Kelancha Shira
NEW BOLLYWOOD MOVIE



साहित्य :
  • कच्ची केळी - ३ ते ४
  • साखर - २५० ग्राम 
  • तूप - १ कप 
  • काजू - १/२ कप (बारीक तुकडे केलेले )
  • दूध - २ कप 
  • वेलची - ३ ते ४ ( कुटून पूड केलेली )
कृती :
  • कच्च्या केळींना धुऊन प्रेशर कुकरमध्ये एकाद कप पाणी टाकून १० मिनिटे (किंवा एक सिटी होईपर्यंत ) शिजून घ्या . 
  • तयार केळींची साल काढून वेगळी करा व एकाद प्याल्याने वा चमच्याने चांगले कुस्करून बाजूला ठेवा 
  • एका पॅन मध्ये तूप टाका तूप गरम झाले कि त्यात कुस्करलेली केळी परतून घ्या. 
  • त्यात साखर टाका आणि आणखी थोड्या वेळ परता . 
  • आता त्यात दूध व काजू टाका व मधून मधून हलवीत जरा घट्ट हिपर्यंत शिजवा . 
  • आता त्यात वेलची पावडर टाकून जरा परता . 
  • तुमचा कच्या केळांचा शिरा तयार आहे , गरमा गरम सर्व करा . 

राजगिरा लाडू - Rajgira Ladoo

राजगिरा लाडू - Rajgira Ladoo
NEW BOLLYWOOD MOVIE



साहित्य :
  • राजगिरा - २०० ग्राम 
  • गूळ किंवा साखर - २०० ग्राम (बारीक केलेला)
  • काजू - ५० ग्राम (बारीक तुकडे केलेले)
  • तूप - २ चमचे 
कृती :
  • पॅन ग्यासवर ठेवा व गरम होऊ घ्या . 
  • पॅन गरम झाले कि एक दोन चमचे राजगिरा त्यावर टाकीत राजगिरा चांगला फुलेपर्यंत हलवीत रहा . 
  • फुललेला राजगिरा एका भांडयात काढा व चाळणीने चाळून नफुललेला राजगिरा वेगळा करा . 
  • आता पॅन मध्ये तूप टाका व ते गरम झालेकी त्यात गूळ टाका , गूळ हळू हळू वितळायला लागेल 
  • गुल पूर्ण वितळला कि त्यात थोडे पाणी टाकून चाचणी तयार करा . 
  • तयार चाचणीला राजगिऱ्यामध्ये टाका , काजूचे तुकडे टाका व चांगले मिक्स करून घ्या . 
  • हातांना थोडे पाणी लाऊन गरम गरम मिश्रणाचे हव्या त्या आकाराचे लाडू बांधून घ्या. 

भरली वांगी - Bharli Vangi

भरली वांगी - Bharli Vangi
NEW BOLLYWOOD MOVIE



साहित्य :
  • हिरवी काटेरी वांगी - २५० ग्राम (छोट्या आकाराची )
  • शेंगदाणे - १ कप (भाजून बारीक पूड केलेले )
  • तीळ - २ चमचे (हलकी भाजलेली )
  • लसूण - ३ पाकळ्या (काप केलेले)
  • आले - १ छोटा तुकडा 
  • कांदा - १ मध्यम आकाराचा (बारीक चिरलेला)
  • कोथिंबीर - १/२ कप (बारीक चिरलेली )
  • टोमॅटो - १ (काप केलेला)
  • लाल तिखट - १ ते २ छोटे चमचे (किंवा आवश्यकतेनुसार )
  • हळद - १ छोटा चमचा 
  • धणेपूड - १ छोटा चमचा 
  • जिरे - १ १/२ छोटा चमचा 
  • हिंग - चिमूटभर 
  • तेल - २ मोठे चमचे 
  • पाणी - २ कप 
  • मीठ - चवीपुरते 

कृती :

  • सर्वप्रथम वांगी चांगली धुऊन घ्या . व त्यांचे देठ शाबूत ठेऊन खालच्या बाजूने ४ काप करा. 
  • नंतर पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवा . तेल गरम झालेकी त्यात कांदा थोडा सोनेरी रंग होईपर्यंत परता . 
  • आता त्यात जिरे , हळद , लालतिकाट , हिंग व धणेपूड टाका व थोडे परतून घ्या . 
  • त्यात आता टोमॅटो आणि मीठ टाकून थोड्या वेळ आणखी मिक्स करीत रहा . 
  • आता ग्यास बंद करा व मिक्सी मध्ये शेंगदाणे , तीळ , आले , लसूण , कोथिंबीर आणि तयार मिश्रण चांगले बारीक करून घ्या . 
  • तयार मिश्रण वांग्यांच्या कपांमध्ये भरायला सुरवात करा . 
  • पुन्हा त्याच पॅन मध्ये थोडे तेल टाका तेल गरम झाले कि थोडे लसूण आणि कीरे टाकून परता . 
  • आता त्यात भरलेली वांगी टाका व पॅनला जरा हलवा जेणेकरून तेल सर्व वांग्यांना लागेल २ ते ३ मिनिटे वांगी परतल्यानंतर त्यात पाणी घाला . व आवश्यकता वाटत असल्यास मीठ टाका व १० १५ मिनिट शिजू घ्या . 
  • तुमची भरलेली वांगी तयार आहेत . 


आळू वडी - aluvadi

आळू वडी - aluvadi
NEW BOLLYWOOD MOVIE


साहित्य :
  • आळूची कोवळी पाने - ५ ते १० ( मध्यम आकाराचे )
  • बेसन - १ कप 
  • तांदळाचे पीठ - १/२ कप 
  • गुळ - १/२ मोठा चमचा (बारीक केलेला )
  • तेल - १ मोठा चमचा 
  • हिंग - चिमटीभर 
  • ओवा - १ छोटा चमचा 
  • हळद - १ छोटा चमचा 
  • धणेपूड - १ छोटा चमचा 
  • लाल तिखट - १ छोटा चमचा किंवा आवश्यकतेनुसार 
  • जिरे - १छोटा चमचा 
  • हलके भाजलेले तीळ - १ मोठा चमचा 
  • कोथिंबीर - १/४ कप (बारीक चिरलेली )
  • मीठ - चवीपुरते 
कृती :
  • सर्वप्रथम आळूच्या पानांना चांगले धुऊन, त्याच्या दांड्या तोडून बाजूला ठेवा . 
  • आता एका भांड्यात बेसन घ्या त्यात तांदळाचे पीठ, कोथिंबीर , तेल , जिरे, हिंग, हळद , धणेपूड , लालतिखट , तीळ, गूळ , व मीठ टाकून थोडे थोडे पाणी टाकीत घट्ट आसे मिश्रण तयार करा . 
  • एक आळूच पान घ्या, उलटी बाजूने टोक खालच्या राहील असे ठेऊन त्यावर तयार मिश्रणाचा हाताच्यामदतीने एक हलका थर लावा . व आणखी एक आळूचे पान घेऊन उलटे त्यावर ठेवा . व त्यावरही मिश्रण लावा 
  • असे ४ ते ५ पाने एकावर एक लावून उजव्या आणि डाव्या बाजूच्या कडा मोडून घ्या . व त्यावरही मिश्रण लावा . 
  • आता वरच्या बाजूने मोडीत पानांची गोल घडी तयार करा . 
  • तयार पानांना वाफवण्यासाठी प्रेशर कुकर मध्ये खालच्या भांडयात पाणी घेऊन त्यावर एखाद प्लेट ठेवा व सर्व पानांच्या घड्या त्यावर ठेवा . 
  • प्रेशर कुकरच झाकण विना सिटीचा लावून घ्या . व १५ मिनिटे वाफवा . 
  • नंतर चाकूच्या मदतीने छोटे छोटे स्लाइस कापून घ्या . 
  • पॅन मध्ये तेल ग्राम करायला ठेवा व तयार वड्या हलका तपकिरी रंग होईपर्यंत तळून घ्या . 
  • तुमच्या अळूच्या वड्या तयार आहेत, गरमा गरम सर्व करा 

मुंगाची उसळ - Mungachi Usal

मुंगाची उसळ - Mungachi Usal
NEW BOLLYWOOD MOVIE



साहित्य :
  • मुंग - २ कप 
  • कांदे - २ (बारीक चिरलेले)
  • कढीपत्ता - १ ते २
  • मोथिंबीर - १/२ कप (बारीक चिरलेला )
  • हिंग - चिमटीभर 
  • लाल तिखट - १ छोटा चमचा (किंवा आवश्यकतेनुसार )
  • धणेपूड - १ छोटा चमचा 
  • हळद - १ छोटा चमचा 
  • तेल - २ चमचे 
  • टोमॅटो- १ ( बारीक काप केलेला )
  • जिरे - १ छोटा चमचा 
  • लसूण - १ ते २ पाकळी (बारीक काप लेलेला )
  • पाणी - २ कप 
  • मीठ - चवीनुसार 
कृती :
  • सर्वप्रथम मुंगाला चांगले धुऊन ४ ते ५ तासाकरिता पाण्यामध्ये भिजत ठेवा . नंतर एक सुती कपड्यात बांधून पुन्हा ४ तासांकरिता बाजूला ठेवा जेणेकरून मुंगाला चांगले कोम येतील 
  • कोम आलेले मुंगाला चांगले धुऊन घ्या . व एका पातेल्यात काढा . 
  • आता एका पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवा . तेल गरम झाले की त्यात बारीक केलेली कांदे टाका . व हलका सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्या . 
  • आता त्यात लसूण, कढीपत्ता टाका व थोडे परतून घ्या .  
  • नंतर जिरे , लाल तिखट , हिंग . हळद  व धणेपूड टाकून परता . 
  • आता त्यात टोमॅटो टाका व थोड्यावेळ आणखी परता  आणि मुंग टाका व मिक्स करा . 
  • नंतर त्यात पाणी टाका व मीठ टाकून १० मिनिटे शिजू घ्या . 
  • आता चमच्याच्या मदतीने थोडे मुंग घेऊन ते ववर्स्थित शिजले की नाही याची खात्री करून ग्यास बंद करा
  • तुमची .मुंगाची उसळ तयार आहे, बारीक चिरलेल्या कोथिंबिरीने वरून सजवा व ग्राम गरम सर्व करा . 

सांबर - Sambar Recipe

सांबर - Sambar Recipe
NEW BOLLYWOOD MOVIE



साहित्य :
  • तुळीची डाळ - २५० ग्राम 
  • लाल तिखट - १ छोटा चमचा 
  • हिंग- १ छोटा चमचा 
  • हळद - १ छोटा चमचा 
  • कोथिंबीर - १/२ कप (बारीक चिरलेली)
  • चिंचेचा गर - ५० ग्राम 
  • टोमॅटो - २ (बारीक काप केलेले)
  • बटाटे - २ (बारीक काप केलेले)
  • कांदा - १ (बारीक चिरलेला)
  • वांग - १ ते २ (बारीक केलेलं)
  • तेल - २ ते ३ छोटे चमचे 
  • शेवग्याच्या शेंगा - १ ते २ ( तुकडे केलेल्या )
  • लाल मिरची - २ ते ३
  • राई - १ छोटा चमचा 
  • लसूण - १ ते पाकळ्या ( बारीक काप केलेला )
  • कढीपत्ता - ५ ते ६
  • मीठ - चवीपुरते 
कृती :
  • सर्वप्रथम तुळीच्या डाळीला चांगली धुऊन प्रेशर कुकर मध्ये २ ते ३ कप पाणी टाकून शिजून घ्या. 
  • दरम्यान एका प्याल्यात थोडे गरम पाणी घेऊन चिंच जवळ जवळ अर्ध्या तासाकरिता भिजत ठेवा . 
  • आता त्यात टोमॅटो, बटाटे, कांदा , शेवग्याच्या शेंगा , वांग टाकून आणखी एखाद सिटी होऊ घ्या . 
  • आता त्यात थोडे पाणी आणि चिंचेचा गर टाकून मधून मधून ढवळीत १५ मिनिटे मंद आचेवर शिजू घ्या . 
  • फोडणी देण्यासाठी एका पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवा . त्यात मोहरी टाकून जरा परता , त्यात लसूण , लाल मिरची , कढीपत्ता व हिंग टाकून लसूण हलका सोनेरी होईपर्यंत आणखी थोड्या वेळ परता . 
  • आता त्यात तयार डाळीचे मिश्रण टाकून ५ मिनिटे उकळवा . 
  • तुमचा गरमा गरम सांबर तयार आहे . वरण थोडी कोथिंबीर टाकून सजवा . 

दही वडे - Dahi Wade

दही वडे - Dahi Wade
NEW BOLLYWOOD MOVIE



साहित्य :
  • उडदाची डाळ - २ कप (२५० ग्राम )
  • दही - ५०० ग्राम 
  • जिरेपूड - २ छोटे चमचे 
  • अद्रक पेस्ट - १ छोटा चमचा 
  • धणेपूड - १ छोटा चमचा 
  • मोथिंबीर - १/२ कप ( बारीक कापलेली )
  • हिरवी मिरची - २ (बारीक कापलेली )
  • हिंग - १ छोटा चमचा 
  • चाट मसाला - १ छोटा चमचा'
  • लाल तिखट - १ छोटा चमचा ( किंवा चवीनुसार )
  • तेल - तळण्यापुरते 
  • काळे मीठ किंवा साधे मीठ - चवीपुरते 
कृती :
  • सर्वप्रथम उडद डाळ चांगली धुऊन ४ ते ५ तासांकरिता पाण्यामध्ये भिजत ठेवा . 
  • नंतर सर्व पाणी काढून घेऊन हलकी जाडसर मिक्सर मध्ये (पाणी न टाकता किंवा किंचित पाणी टाकून) बारीक करून घ्या . 
  • तयार डाळीच्या पेस्टला चमच्याने चांगले फेटा जेणेकरून ती एकजीव होईल . 
  • आता त्यात हिंग, अद्रक ची पेस्ट, हिरवी मिरची आणि थोडे मीठ टाकून मिक्स करा . 
  • पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवा ,तेल गरम झालेकी तयार मिश्रणाचे हव्या त्या आकाराचे गोळे करून तेलात सोडा. व हलका सोनेरी रंग होईपर्यंत दोन्ही बाजूने तळा . 
  • तळलेले वडे एका प्लेटमध्ये काढून थोडे थंड होऊ द्या . 
  • वडे थंड जाहलेकी त्यांना एका भांड्यात पूर्ण वडे दुबेल असे पाणी घ्या व त्यात थोडे मीठ टाका . 
  • आता सर्व वडे त्यात टाका व १५ ते २० मिनिटे बाजूला ठेवा .
  • नंरत एक एक वड्याला हाताने हलके दाबीत त्यातले पाणी काढीत प्लेटमध्ये ठेवा . 
  • एक दोन वडे छोट्या प्लेटमध्ये घेऊन त्यावर दही टाका . थोडे जिरेपूड , धणेपूड, लाल तिखट , चाटमसाला ,काळे मीठ, आणि थोडी कोथिंबीर टाकून सर्व करा. 

बटर चिकन - Butter Chicken

बटर चिकन - Butter Chicken
NEW BOLLYWOOD MOVIE



बटर चिकन - Butter Chicken

साहित्य :

  • चिकन - ५०० ग्राम (मध्यम काप केलेले)
  • अद्रक लसूण ची पेस्ट - २ छोटे चमचे 
  • टोमॅटो - ५०० ग्राम (मध्यम काप केलेले )
  • कांदे - २ मध्यम आकाराचे ( बारीक काप केलेले )
  • लाल तिखट - २ ते ३ छोटे चमचे ( किंवा आवश्यकतेनुसार )
  • तेल - १/२ कप 
  • कस्तुरी मेथी - १ छोटा चमचा 
  • कोथिंबीर - १/२ कप 
  • क्रीम - १/२ कप 
  • लोणी - १ कप 
  • गरम मसाला - १ छोटा चमचा 
  • पाणी - २ कप 
  • मीठ - चवीपुरते 
कृती :
  • एका पातेल्यात चिकनचे तुकडे घ्या . त्यात १ चमचा अद्रक लसूणची पेस्ट, १ चमचा लाल तिखट आणि थोडे मीठ टाका व चांगले मिक्स करून अर्ध्या तासाकरिता बाजूला ठेवा . 
  • अर्ध्या तासांनंतर ग्यासवर पॅन  ठेवा पॅन गरम झाला की त्यात थोडे तेल टाकून चिकनला जरा परतून घ्या . व काढून बाजूला ठेवा . 
  • त्याच पॅन मध्ये थोडे तेल टाका , व कापलेले कांदे आणि एक चमचा लोणी टाकून कांदे हलके सोनेरी होईपर्यंत परता . 
  • आता त्यात टोमॅटो , गरम मसाला , लाल तिखट , अद्रक लसूण ची पेस्ट व मीठ टाका. सर्व चांगले मिक्स करून घ्या. 
  • आता मिश्रणात पाणी टाकून १० ते १५ मिनटे शिजू घ्या . टोमॅटो चांगले नरम झाले की मिश्रणाला एक पातेल्यात काढून घ्या . 
  • मिक्सर ग्रॅन्डरने वा हॅन्ड मिक्सरने मिश्रणाची पेस्ट करा . 
  • आता त्याच पॅन मध्ये तयार मिश्रण चाळणीने गाळून घ्या . आणखी एकदा गरम करायला ठेवा . 
  • त्यात उरलेले लोणी , थोडी क्रीम आणि चिकन टाकून मिक्स करा व १० मिनिटनकरिता पकवा . 
  • तुमचे बटर चिकन तयार आहे , थोडी क्रीम, थोडी कोथिंबीर आणि कापलेले कांदे टाकून सजवा . हे तुम्ही तवा नाणं अथवा पळी सोबत सर्व करू शकता . 

हैद्राबादी बिर्याणी (चिकन) - Hyderabadi Biryani (Chicken)


हैद्राबादी बिर्याणी (चिकन) - Hyderabadi Biryani (Chicken)
NEW BOLLYWOOD MOVIE



साहित्य :
  • चिकन - १ किलो (मध्यम आकाराचे काप केलेले )
  • बासमती तांदूळ - ५०० ग्राम (अर्धवट शिजलेले )
  • अद्रक लसूण पेस्ट - १ छोटा चमचा 
  • लाल तिखट - २ छोटे चमचे ( किंवा आवश्यकतेनुसार )
  • कांदा - २ ( बारीक काप करून तेलामध्ये हलका सोनेरी परतलेला)
  • धने पूड - १/२ छोटा चमचा 
  • निंबू रस - २ छोटे चमचे 
  • दही - २०० ग्राम 
  • तेल - १/२ कप 
  • जिरे - १ छोटा चमचा 
  • दालचिनी - २ ते ३
  • तेजपान - ३ ते ४
  • शहाजिरे - १ छोटा चमचा 
  • मोठी वेलची - २ ते ३
  • दगडफूल - १
  • मिरे - १ छोटा चमचा
  • कोथिंबीर - १/२ कप ( बारीक चिरलेली )
  • हिरव्या मीरची - २ ते ३ (काप केलेली )
  • हळद - २ छोटे चमचे 
  • तूप - १/२ काप 
  • केसर - ३ ते ४ धागे ( १/२ कप दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये भिजून ठेवलेले )
  • मीठ - चवीनुसार 
कृती :
  • एक जाड बुडाच्या पातेल्यात चिकन चांगले धुऊन घ्या . आणि त्यात सर्व मसाला टाका, लाल तिखट , अद्रक लसूण पेस्ट , हळद , धने पूड , दही , कोथिंबीर , तळलेली कांदे , निंबू रस , हिरवी मिरची आणि थोडे तेल . व मिश्रण चांगले ढवळून घ्या . तयार मिश्रण २ ते ३ तासांकरिता बाजूला ठेवा . 
  • आता चिकनच्या पातेल्यामध्ये  तांदूळ टाका व  एक परत तयार करा . 
  • आता त्यावर थोडे तळलेली कांदे टाका , भिजवलेले केसर टाका , व वरून तूप पसरवा . 
  • पातेल्यावर झाकण ठेऊन त्याच्या कडा भिजवलेल्या कणकेच्या गोळ्याने बंद करा जेणेकरून बिर्याणी मधील वाफ बाहेर निघणार नाही . 
  • आता पातेल्याला ग्यास वर ठेऊन जवळ जवळ २० ते ३० मिनिटे शिजू द्या . 
  • ग्यास मंद करा व १० मिनिटे आणखी शिजू द्या जेणेकरून तांदूळ चांगला मुरेल 
  • तुमची हैद्राबादी चिकन बिर्याणी तयार आहे , आता झाकणाला बाजूला करून बिर्याणीला पूर्ण मिक्स न करता चमच्याने अलगत तांदूळ बाजूला करून चिकन हलके तपकिरी झाले की नाही हे पहा . 

मसाला चहा - msala chha

मसाला चहा - msala chha
NEW BOLLYWOOD MOVIE



साहित्य :
  • पाणी  - २ कप 
  • साखर - ४ चमचे किंवा आवश्यकतेनुसार 
  • चहा पावडर - २ छोटे चमचे 
  • दूध - १ काप किंवा आवश्यकतेनुसार 
  • छोटी वेलची - २ ते ३
  • लवंग - २
  • आले - १ छोटा तुकडा 
कृती :
  • एखाद्या खलामध्ये आले, छोटी वेलची, आणि लवंग बारीक करून घ्या . आणि बाजूला ठेवा . 
  • एखाद्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवा . 
  • पाणी उकळले की त्यात तयार पेस्ट टाका आणि २ ते ३ मिनिटांकरिता आणखी उकळू द्या . 
  • आता त्यात साखर टाका आणि चहापत्ती पावडर टाका व १ ते २ मिंटनकरिता उकळू द्या . 
  • आता त्यात दूध टाका व आणखी २ ते ३ मिनिटे उकळू द्या . 
  • तुमचा मसाला चहा तयार आहे, तो गरम  गरम सर्व करा . 

हरभऱ्याच्या डाळीचे वडे - Harbharyachya Daliche vade

हरभऱ्याच्या डाळीचे वडे - Harbharyachya Daliche vade
NEW BOLLYWOOD MOVIE


साहित्य :
  • हरभऱ्याची डाळ - २५० ग्राम 
  • बेसन - १ मोठा चमचा 
  • कांदा - २ मध्यम आकाराचे (बारीक काप केलेले )
  • हिरवी मिरची - २ ते ३ ( बारीक काप केलेली )
  • कढीपत्ता - ५ ते ६
  • कोथिंबीर - १/२ वाटी ( बारीक काप केलेली)
  • लाल तिखट - २ ते ३ छोटे चमचे (किंवा आवश्यकतेनुसार )
  • तेल - तळण्यासाठी 
  • मीठ - चवीनुसार 
कृती :
  • हरभऱ्याची डाळ चांगली स्वच्छ धुऊन घ्या व २ ते ३ तासांकरिता भिजत ठेवा . 
  • नंतर एखाद्या चाळणीमध्ये डाळ काढून सर्व पाणी काढून द्या . 
  • आता ती मिक्सर मध्ये हलकी बारीक करा . काही हरभऱ्याची डाळ सलग राहील याची काळजी घ्या . 
  • आता एक पातेल्यात डाळ घ्या , त्यात बेसन , कांदा , लालमिर्ची , हिरवी मोरची , कढीपत्ता , मोथिंबीर आणि मीठ टाकून मिश्रण चांगले एकजीव करा . 
  • एक कढईत तेल गरम करायला ठेवा . दरम्यान तयार मिश्रणाचे छोतासा भाग घेऊन हातांच्या मदतीने मध्यभागी जरा दाब देऊन गोल आकार द्या . 
  • तेल चांगले गरम झाले की तयार वडा अलगत तेलात सोडा . 
  • वड्याचा रंग सोनेरी , चुरकुरीत झालाकी त्याला पालटून दुसरी बाजू सुद्धा तळून घ्या . 
  • अश्याच पद्धतीने सर्व वडे तळून तयार करा व टोम्याटो केचप वा दह्यासोबत सर्व करा . 

निंबाचे लोणचे - Nimbache Lonche

निंबाचे लोणचे - Nimbache Lonche
NEW BOLLYWOOD MOVIE



साहित्य :
  • निंबू - १/२ किलो 
  • लाल तिखट - १०० ग्राम ( किंवा आवश्यकतेनुसार )
  • मीठ - २०० ग्राम 
  • हळद - २ छोटा चमचा 
  • हिंग - १ छोटा चमचा 

कृती :
  • सर्वप्रथम निंबू चांगले धूऊन पाण्यामध्ये ४ ते ५ भिजत ठेवा . नंतर निंबू बाहेर काढून साफ कपड्याने पुसून घ्या व थोडे सुकू द्या . 
  • आता एक स्वच्छ पातेलं घेऊन उकडलेल्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या . व कपड्याने पुसून कोरडे करा . 
  • आता त्यात निंबाचे हव्या त्या आकाराचे काप करून टाका . काप करतानाच निंबातल्या बिया वेगळ्या करून घ्या. त्यात लाल तिकट , हिंग आणि मीठ टाकून कोरड्या चमचायने चांगले ढवळून घ्या . 
  • एखादी काचेची बरणी घेऊन ती सुद्धा उकळलेल्या पाण्याने स्वच्छ धुऊन कोरडी करा .
  • आता तयार मिश्रण बरणीत टाकून जवळ जवळ २० ते २५ दिवस ठेवा . दरम्यान एक ते दोन दिवसाने निंबाच्या लोणच्याला हलवीत चला जेणेकरून निंबाचे लोणचे समप्रमाणात तयार व्हायला मदत होईल . 
  • तुमचे निंबाचे लोणचे तयार आहे. 


काकडीचे धपाटे - Kakdiche Dhapate


NEW BOLLYWOOD MOVIE

साहित्य :
  • कोवळी काकडी - १/२ किलो 
  • हिरवि मोरची - २ ( काप केलेली )
  • ओवा - १ छोटा चमचा 
  • लाल तिखट - २ छोटे चमचे ( किंवा आवश्यकतेनुसार )
  • हळद - १ छोटा चमचा 
  • जिरे - १ छोटा चमचा 
  • कांदे - २ साधारण आकाराचे ( बारीक काप केलेले )
  • बेसन - २ मोठे चमचे 
  • ज्वारीचे पीठ - १ मोठा चमचा 
  • तेल - २ ते ३ मोठे चमचे 
  • मीठ चवीनुसार 
कृती :
  • सर्वप्रथम काकडीला चांगले धुऊन किसणीने बारीक करून घ्या . 
  • एक मोठ्या भांड्यात किसलेली काकडी घ्या . त्यात बेसन व ज्वारीचे पीठ टाका . जिरे, हळद , लाल तिखट , हिरवी मिरची , कांदा , ओवा  व मीठ टाकून मिश्रण चांगले एकजीव होईपर्यंत ढवळून घ्या . 
  • बेसनाच्या गाठा  शिल्लक राहणार नाही याची काळजी घ्या . 
  • ग्यासवर तवा ठेऊन छोट्या चमच्याने थोडे तेल पसरवा , तेल गरम झालेकी एका मोठ्या चमच्याने किंवा हाताने थोडे मिश्रण तव्यावर टाकून गोल आकार द्या . 
  • थोडे तेल धोपटीच्या भोवताली सोडा , धपाटा थोड्यावेळ भाजू द्या आणि एखाद्या सराट्याच्या मदतीने त्याच्या कडा मोकड्या करून घ्या . व थोडे तेल धपाट्यावर टाका . 
  • थोड्या वेळाने धपाट्याचा रंग हलका सोनेरी झाला की . त्याला पालटा .  व  दुसऱ्या बाजूलाही भाजून घ्या . 
  • तुमचे गरमा गरम काकडीचे धपाटे तयार आहेत . हे तुम्ही दह्यासोबत वा लोणच्या सोबत सर्व करू शकता . 

Popular Posts

हॅप्पी भाग जएजी हिंदी फिल्म