रेसिपी शोधा

तवा नान - Twa Naan

तवा नान - Twa Naan

साहित्य :

  • मैदा - ३००ग्राम 
  • बेकिंग सोडा - अर्धा चमचा 
  • तेल - १ चमचा 
  • दही - १/४ कप 
  • साखर - १ छोटा चमचा 
  • मीठ - स्वादानुसार 
कृती :
  • सर्वप्रथम एका भांड्यात मैदा , साखर व बेकिंग सोडा घ्या . आता त्यात दही टाकून चांगले मिक्स करून घ्या . नंतर थोडे थोडे हलके गरम पाणी टाकीत मैद्याला चांगले मळा . आता थोड्या तेलाच्या मदतीने मैदा चांगला गुळगुळीत होईपर्यंत मळा . व जवळ जवळ ३ तासांकरिता बाजूला ठेवा जेणेकरून मैद्याचा गोळा फुलून नान तयार करायला तयार होईल . 
  • आता तयार गोळ्याचे हव्या त्या आकाराचे गोळे तोडून घ्या . व तवा गरम करायला ठेवा . 
  • आता एक गोळा घ्या व हलका मैद्यात घोळून लाटायला घ्या . तयार पोळीवर थोडे पाणी लावा व तोच वोला भाग तव्यावर जाईल आश्या रीतीने नान तव्यावर टाका . 
  • नान चा रंग थोडा गर्द झालाकी तवा ग्यासवर उलटा पकडा व इकडेतिकडे हलवीत नानला थोडे तपकिरी डाग येईपर्यंत शेका . व नंतर तवा पुन्हा सरळ करून सराट्याच्यामदतीने नानला काढा व थोडेसे तूप लाऊन प्लेटमध्ये जमा करा . व गरम गरम सर्व करा . 

Popular Posts

हॅप्पी भाग जएजी हिंदी फिल्म