रेसिपी शोधा

वाटाणा गाजर भाजी - Watana Garar Bhaji

वाटाणा गाजर भाजी - Watana Garar Bhaji

साहित्य :
 • गाजर - २ मोठे ( सोलून छोटे तुकडे केलेले )
 • सोललेला वाटाणा - २०० ग्राम 
 • टमाटे - २ मोठे ( बारीक काप केलेले )
 • जिरे - १/२ छोटा चमचा 
 • आले पेस्ट - १/२ छोटा चमचा 
 • हिरवी मिरची - १ ( काप केलेली )
 • हळद - १/२ छोटा चमचा 
 • लाल तिखट - १/२ छोटा चमचा 
 • धणे पावडर - १/२ छोटा चमचा 
 • हिंग - १/४ छोटा चमचा 
 • तेल - २ मोठा चमचा 
 • मीठ - आव्श्क्तेनुसार 
कृती :
 • एका कढईत तेल गरम करायला ठेवा . तेल गरम झाले कि त्यात जिरे , हळद , हिंग , आले पेस्ट , धणे पावडर व हिरवी मिरची टाकून परतून घ्या . 
 • आता त्यात गाजर , वाटाणा , लाल टिकट आणि मीठ टाका व आर्धा कप पाणी टाकून सर्व मिश्रणाला मिक्स करा. भाजीला चांगले शिजू द्या . 
 • भाजी चांगली शिजल्यानंतर त्यात टमाटे टाकून आणखी २ मिनिटाकरिता आणखी शिजू द्या . 
 • भाजी चांगली शिजल्या नंतर ग्यास बंद करा व एका पतेलात काढून थोड्या हिरव्या कोथिंबीरने सजवा . 

Popular Posts

हॅप्पी भाग जएजी हिंदी फिल्म