भाजी करण्यासाठी:
साहित्य :
- बटाटा - 200 ग्रॅम चिरलेला
- गाजर - 100 ग्रॅम चिरलेला
- फुलकोबी - 100 ग्रॅम चिरलेला
- मटार 100 ग्रॅम किंवा 1 कप
- तेल किंवा तूप 2 टे स्पून
- जिरे - 1/2 चमचा
- हळद - 1/2 चमचा
- मिरची पावडर - 1/2 चमचा
- पाव भाजी मसाला - 2 चमचा
- टोमॅटो - 2 बारीक चिरून
- मिरची - 2 बारीक चिरून
- आले - 1 तुकडा ( बारीक चिरलेला ) किंवा 2 चमचा पेस्ट
- 4 - 3 - हिरव्या मिरच्या ( बारीक चिरून )
- कोथिंबीर - 100 ग्रॅम ( बारीक चिरून )
- लिंबू - 1
- मीठ ( आवडीनुसार )
- लोणी (आवश्यकतेनुसार )
- सर्वप्रथम सर्व भाज्या (बटाटे, गाजर , फुलकोबी इत्त्यादी ) एक कप पाणी आणि अर्धा चमचा मीठ टाकून चांगल्या उकळून घ्या . आता एका चमच्याच्या मदतीने सर्व भाज्या चांगल्या मॅश करा व बाजूला ठेवा .
- एका पॅन मध्ये तेल किंवा तूप गरम करायला ठेवा , गरम झालेल्या तेलात जिरे टाका . आता त्यात बारीक चिरलेला कांदा टाका व हलका तांबडा रंग येईपर्यंत परतून घ्या .
- नंतर त्यात हळद, टोमॅटो, मिरची पावडर आणि हिरव्या मिरच्या टाका व २ ते ३ मिनिटे सिजु द्या . आता त्यात आलं आणि पाव भाजी मसाला टाका आणि चांगले परतून घ्य.
- आता त्यात मॅश केलेल्या भाज्या टाका , आवस्क्तेनुसार मीठ आणि पाणी टाकून उकळी येऊ द्या .
- तुमची पावभाजी आता तयार आहे , आता तुम्ही ग्यास बंद करू शकता.
- आता एका वाटीत पावभाजी घेऊन तिला कोथिंबीर आणि लोण्याने सजवा .
पाव बनवण्यासाठी :
- पाव - १०
- लोणी (आवश्यकतेनुसार)
कृती -
- पावांना मध्यभागातून एक भाग सोडून काप करा .
- एका गरम पॅन वर,थोडे लोणी वितळायला ठेवा .
- त्या पॅन वर २ ते ३ पाव ठेऊन त्यांची दोन्ही बाजू भाजून घ्या . आता थोडे लोणी पावांच्या आतल्या बाजूस लाऊन हलके तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या . आता आपले पाव तयार आहे.
- गरम गरम भाजी सोबत दोन पाव आणि एक कापलेल्या लिंबसोबत सर्व्ह करा.