रेसिपी शोधा

मिल्क मैसूरपाक - milk maisoor pak

मिल्क मैसूरपाक - milk maisoor pak

साहित्य :
  • बेसन - १ कप 
  • साखर- २ कप 
  • तूप - २ कप 
  • दुध - अर्धा कप 
  • वेलची - ३ ते ४ ( कुटून पावडर केलेली )
कृती :
  • सर्वप्रथम एका कढईत बेसन हलका तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या व शेवटी एक चमचा तूप टाकून आणखी थोड्यावेळ भाजा व बाजूला काढून ठेवा . 
  • आता त्याच काढईत दुध आणि साखर टाका व साखरेला वितळू द्या . घट्ट मिश्रण होईपर्यंत मिश्रणाला निरंतर ढवळीत.  आता एखाद्या चमच्याने मिश्रणाचा एका थेंब एखाद्या प्लेटवर टाकून बघा थेंब घट्ट होत असेल तर तुमचे मिश्रण तयार आहे . 
  • आता त्यात बेसन टाका व चांगले ढवळीत सर्व गाठी काढून घ्या . 
  • आता ग्यास मंद करून त्यात आर्धा कप तूप टाका व निरंतर ढवळीत रहा हळू हळू मिश्रण घट्ट होते . आणि सर्व तूप मिश्रण शोषून घेते. 
  • आता उरलेले तूप थोडे थोडे टाकीत मिश्रण ढवळीत रहा. शेवटी मिश्रण घट्ट सोनेरी रंगाचे तयार होते . 
  • आता त्यात वेलची पावडर टाकून मिक्स करून घ्या . 
  • दरम्यान एका प्लेटला थोडे तुप लाऊन तयार ठेवा . 
  • मिश्रण चांगले घट्ट होईपर्यंत हलवीत रहा शेवटी तयार मिश्रणाला प्लेटमध्ये टाका व थोडे थंड होऊ ध्या . व चाकूच्या मदतीने हव्या तेवढ्या आकाराचे काप करून घ्या . 
  • तुमचा मिल्क मैसूर पाक तयार आहे . 

Popular Posts

हॅप्पी भाग जएजी हिंदी फिल्म