गाजर हलवा - Gajar Halva
साहित्य :
साहित्य :
- गाजर - १ किलो
- साखर - २०० ते ३०० ग्राम
- दूध - १०० मिली
- वेलची - ५ ( कुटून बारीक पावडर केलेली )
- तूप - १ मोठा चमचा
- काजू - २० ग्राम ( तुकडे केलेले )
- मनुका - २० ग्राम
कृती :
- सर्वप्रथम गाजरांना छिलून चांगले धुन घ्या . व बारीक कीस करा .
- एका कढईत तूप टाका तूप गरम झाले कि त्यात किसलेले गाजर व दुध टाका . व मंद आचेवर शिजू द्या . मधून मधून हलवीत रहा .
- गाजर पुर्णतः नरम होईपर्यंत शिजवा , गाजरांचा रंग हलका गर्द झाला कि त्यात वेलची , काजू आणि मनुका टाका व आणखी २ ते ३ मिनिटांकरिता हलवीत शिजू द्या .
- तुमचा गाजरचा हलवा तयार आहे .