रेसिपी शोधा

पनीर पुलाव - Paneer Pulao

पनीर पुलाव - Paneer Pulao


साहित्य :
  • तांदूळ - ५०० ग्राम 
  • पनीर - २५० ग्राम (काप केलेले )
  • गाजर - २ छोटे ( छोटे छोटे काप केलेले )
  • हिरवा वटाना - २५० ग्राम 
  • तेल - २५० ग्राम 
  • जिरे - १ छोटा चमचा 
  • कांदा - १ मोठा ( बारीक चिरलेला )
  • अद्रक लहसून पेस्ट - १ छोटा चमचा 
  • कोथिम्बिर - १/२ कप (बारीक चिरलेली )
  • निंबू - १
  • मीठ- आव्श्क्तेनुसार 
मसाला बनविण्यासाठी :
  • मोठी वेलची - २ ते ३
  • छोटी वेलची - २
  • लवंग - ३ ते ४
  • मिरे- १०
  • दालचिनी - १
  • शहाजिरे - १ छोटा चमचा 
कृती :
  • सर्वप्रथम तांदूळ चांगले धून घ्या . व एका भांड्यात पूर्ण दुबेल आसे पाणी टाकून आर्धा तासाकरिता बाजूला ठेवा . नंतर बाहेर काढून चांगले शिजून घ्या . 
  • एका प्यान मध्ये थोडे तेल टाका.  तेल गरम झाले कि काप केलेले तुकडे तळायला टाका व हलका सोनेरी रंग होईपर्यंत दोन्ही बाजूने तळून घेऊन एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवा . 
  • आता त्याच तेलात सर्व मसाले म्हणजे मोठी वेलची , छोठी वेलची , दालचिनी , लवंग . मिरे , शहाजिरे , जिरे व बारीक चिरलेला कांदा २ मिनिटे भाजून घ्या . व एका प्लेटमध्ये काढून ठेवा . तयार मिश्रण थंड झालेकी थोडे जाडसर कुटून घ्या . 
  • एका प्यान मध्ये थोड तेल टाका , तेल गरम झालेकी त्यात अद्रक लहसून चा पेस्ट, तयार मसाला टाका व थोड भजून घ्या . आता त्यात हिरवा वाटणा व गाजर टाका . मिश्रणाला चांगले मिक्स करून जवळ जवळ २ मिनिटांकरिता झाकून शिजू द्या . 
  • आता तयार मिश्रणात शिजलेले तांदूळ आणि तळलेले पनीरचे तुकडे, मीठ आणि निंबू रस  टाकून चांगले मिक्स करून घ्या . 
  • तुमचा पनीर पुलाव तयार आहे . थोड्या वेळ शिजू देऊन पुलावला एका प्लेटमध्ये काढा व थोडी कोथिम्बिर टाकून सजवा 

Popular Posts

हॅप्पी भाग जएजी हिंदी फिल्म