साहित्य :
- मैदा - २५० ग्राम
- दही - २०० ग्राम
- साखर - ५०० ग्राम
- जिलेबी रंग - १/४ छोटा चमचा (पर्याई )
- तेल - आव्श्क्तेनुसार
कृती :
- एका भांड्यात मैदा आणि दही घ्या . व मैद्याला सर्व गाठी विरघडेल आसे फेटा , आवश्यक असल्यास थोडे पाणी टाकू शकता . थोड जाड मिश्रण तयार करायचं आहे . या मिश्रणाला जवळ जवळ एक रात्र झाकून बाजूला ठेवा .
- दरम्यान एका भांड्यात साखर टाका व एक ते दीड कप पाणी टाकून चाचणी बनवायला ठेवा . साखर पूर्णतः वीरघडू द्या व एक तारी चाचणी तयार करा . व ग्यास बंद करा .
- एका प्याल्याम्ध्ये एक छोटा चमचा पाणी घ्या व त्यात जिलेबी रंग टाका . रंग पूर्णतः विरघडल्यानंतर तो मिश्रणात टाकून मैद्याच्या मिश्रणाला पुन्हा चांगले फेटून घ्या .एखादा सुती कपडा घ्या व त्याला छोटेसे छिद्र पाडा , अथवा जिलेबी मेकर डब्बा सुध्दा घेऊ शकता . त्यात थोडे मिश्रण टाका
- एका कढईत तेल गरम करायला ठेवा . तेल गरम झाले कि जिलेबी माकेरला कढईवर उलटे पकडा व कढईत मावेल येवढ्या जिलेबी पिळून घ्या . जीलेबिंना हलका तपकिरी रंग येईपर्यंत दोन्ही बाजूने तळा व तेलातून काढून चाचणीमध्ये टाका . १ ते २ मिनिटे चाचणीमध्येच राहू द्या . व नंतर बाहेर काढून गरमा गरम सर्व करा .