रेसिपी शोधा

चिरोटे - Chirote

चिरोटे - Chirote

साहित्य :
  • मैदा - २०० ग्राम 
  • तूप - २०० ग्राम 
  • साखर - १०० ग्राम ( कुटून बारीक पावडर केलेली )
  • मीठ - चिमुटभर 
कृती :
  • एका भांड्यामध्ये मैदा घ्या त्यातला थोडासा एका वाटीत काढून ठेवा . उरलेल्या मैद्याम्ध्ये चिमुटभर मीठ टाका व थोडे थोडे तूप टाकीत मैदा भिजवा, जवळ जवळ १०० ग्राम तूप टाकल्या नंतर थोड्याश्या पाण्याच्या मदतीने मैदा चांगला मळून घ्या . व आर्ध्या तासाकरिता झाकून बाजूला ठेवा . 
  • आता मैदा आणखी थोडासा माळून घेऊन गुळगुळीत आसा गोळा तयार करा . त्याचा थोडासा भाग तोडून थोडी पातळ पोळी लाटायला घ्या . पोळी कोरपाटाला चिपकेल नाही या साठी थोडे तूप लाऊ शकता . तयार पोळी एका प्लेट मध्ये जमा करा . अस्याच ३ पोळी तयार करा . 
  • एका प्याल्या मध्ये उरलेला मैदा घ्या त्यात थोडे तूप टाकून पातळ आसे म,ईश्रण तयार करा . आता एक पोळी घ्या त्यावर एक छोटा चमचा मैद्यचे पातळ मिश्रण पसरवा व त्यावर दुसरी पोळी टाका . त्यावर सुद्धा मैद्याचे एक छोटा चमचा मिश्रण पसरवा व तिसरी पोळी ठेवा . 
  • आता पोळीला रोल करा व चाकूच्या मदतीने हव्या तेवढ्या आकाराचे तुकडे करा . तयार तुकड्यांना आतल्या बाजूने बोटांच्या मदतीने थोडे दाबून एका प्लेटमध्ये जमा करा . 
  • एका कढईत तेल गरम करायला ठेवा . तेल मध्यम गरम झाले कि तयार चिरोटे कढईत मावेल तेवढे तळायला टाका. मधन मधन पालटवीत रहा , चिरोटयांचा सोनेरी रंग झाला कि एका प्लेटमध्ये जमा करा व त्यावर छोट्या चमच्याच्या मदतीने चिरोटयांना पलटवित बारीक केलेली साखर टाका. जेणेकरून साखर चानली त्यांना चीपकेल . 
  • तुमचे कुरकुरीत चिरोटे तयार आहेत , त्यांना साखरेच्या बाहेर काढून एका प्लेटमध्ये जमा करा . 


Popular Posts

हॅप्पी भाग जएजी हिंदी फिल्म