साहित्य :
- हरभऱ्याची डाळ - २५० ग्राम
- बेसन - १ मोठा चमचा
- कांदा - २ मध्यम आकाराचे (बारीक काप केलेले )
- हिरवी मिरची - २ ते ३ ( बारीक काप केलेली )
- कढीपत्ता - ५ ते ६
- कोथिंबीर - १/२ वाटी ( बारीक काप केलेली)
- लाल तिखट - २ ते ३ छोटे चमचे (किंवा आवश्यकतेनुसार )
- तेल - तळण्यासाठी
- मीठ - चवीनुसार
कृती :
- हरभऱ्याची डाळ चांगली स्वच्छ धुऊन घ्या व २ ते ३ तासांकरिता भिजत ठेवा .
- नंतर एखाद्या चाळणीमध्ये डाळ काढून सर्व पाणी काढून द्या .
- आता ती मिक्सर मध्ये हलकी बारीक करा . काही हरभऱ्याची डाळ सलग राहील याची काळजी घ्या .
- आता एक पातेल्यात डाळ घ्या , त्यात बेसन , कांदा , लालमिर्ची , हिरवी मोरची , कढीपत्ता , मोथिंबीर आणि मीठ टाकून मिश्रण चांगले एकजीव करा .
- एक कढईत तेल गरम करायला ठेवा . दरम्यान तयार मिश्रणाचे छोतासा भाग घेऊन हातांच्या मदतीने मध्यभागी जरा दाब देऊन गोल आकार द्या .
- तेल चांगले गरम झाले की तयार वडा अलगत तेलात सोडा .
- वड्याचा रंग सोनेरी , चुरकुरीत झालाकी त्याला पालटून दुसरी बाजू सुद्धा तळून घ्या .
- अश्याच पद्धतीने सर्व वडे तळून तयार करा व टोम्याटो केचप वा दह्यासोबत सर्व करा .