साहित्य :
- आळूची कोवळी पाने - ५ ते १० ( मध्यम आकाराचे )
- बेसन - १ कप
- तांदळाचे पीठ - १/२ कप
- गुळ - १/२ मोठा चमचा (बारीक केलेला )
- तेल - १ मोठा चमचा
- हिंग - चिमटीभर
- ओवा - १ छोटा चमचा
- हळद - १ छोटा चमचा
- धणेपूड - १ छोटा चमचा
- लाल तिखट - १ छोटा चमचा किंवा आवश्यकतेनुसार
- जिरे - १छोटा चमचा
- हलके भाजलेले तीळ - १ मोठा चमचा
- कोथिंबीर - १/४ कप (बारीक चिरलेली )
- मीठ - चवीपुरते
कृती :
- सर्वप्रथम आळूच्या पानांना चांगले धुऊन, त्याच्या दांड्या तोडून बाजूला ठेवा .
- आता एका भांड्यात बेसन घ्या त्यात तांदळाचे पीठ, कोथिंबीर , तेल , जिरे, हिंग, हळद , धणेपूड , लालतिखट , तीळ, गूळ , व मीठ टाकून थोडे थोडे पाणी टाकीत घट्ट आसे मिश्रण तयार करा .
- एक आळूच पान घ्या, उलटी बाजूने टोक खालच्या राहील असे ठेऊन त्यावर तयार मिश्रणाचा हाताच्यामदतीने एक हलका थर लावा . व आणखी एक आळूचे पान घेऊन उलटे त्यावर ठेवा . व त्यावरही मिश्रण लावा
- असे ४ ते ५ पाने एकावर एक लावून उजव्या आणि डाव्या बाजूच्या कडा मोडून घ्या . व त्यावरही मिश्रण लावा .
- आता वरच्या बाजूने मोडीत पानांची गोल घडी तयार करा .
- तयार पानांना वाफवण्यासाठी प्रेशर कुकर मध्ये खालच्या भांडयात पाणी घेऊन त्यावर एखाद प्लेट ठेवा व सर्व पानांच्या घड्या त्यावर ठेवा .
- प्रेशर कुकरच झाकण विना सिटीचा लावून घ्या . व १५ मिनिटे वाफवा .
- नंतर चाकूच्या मदतीने छोटे छोटे स्लाइस कापून घ्या .
- पॅन मध्ये तेल ग्राम करायला ठेवा व तयार वड्या हलका तपकिरी रंग होईपर्यंत तळून घ्या .
- तुमच्या अळूच्या वड्या तयार आहेत, गरमा गरम सर्व करा