रेसिपी शोधा

भरली वांगी - Bharli Vangi

भरली वांगी - Bharli Vangi
NEW BOLLYWOOD MOVIE



साहित्य :
  • हिरवी काटेरी वांगी - २५० ग्राम (छोट्या आकाराची )
  • शेंगदाणे - १ कप (भाजून बारीक पूड केलेले )
  • तीळ - २ चमचे (हलकी भाजलेली )
  • लसूण - ३ पाकळ्या (काप केलेले)
  • आले - १ छोटा तुकडा 
  • कांदा - १ मध्यम आकाराचा (बारीक चिरलेला)
  • कोथिंबीर - १/२ कप (बारीक चिरलेली )
  • टोमॅटो - १ (काप केलेला)
  • लाल तिखट - १ ते २ छोटे चमचे (किंवा आवश्यकतेनुसार )
  • हळद - १ छोटा चमचा 
  • धणेपूड - १ छोटा चमचा 
  • जिरे - १ १/२ छोटा चमचा 
  • हिंग - चिमूटभर 
  • तेल - २ मोठे चमचे 
  • पाणी - २ कप 
  • मीठ - चवीपुरते 

कृती :

  • सर्वप्रथम वांगी चांगली धुऊन घ्या . व त्यांचे देठ शाबूत ठेऊन खालच्या बाजूने ४ काप करा. 
  • नंतर पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवा . तेल गरम झालेकी त्यात कांदा थोडा सोनेरी रंग होईपर्यंत परता . 
  • आता त्यात जिरे , हळद , लालतिकाट , हिंग व धणेपूड टाका व थोडे परतून घ्या . 
  • त्यात आता टोमॅटो आणि मीठ टाकून थोड्या वेळ आणखी मिक्स करीत रहा . 
  • आता ग्यास बंद करा व मिक्सी मध्ये शेंगदाणे , तीळ , आले , लसूण , कोथिंबीर आणि तयार मिश्रण चांगले बारीक करून घ्या . 
  • तयार मिश्रण वांग्यांच्या कपांमध्ये भरायला सुरवात करा . 
  • पुन्हा त्याच पॅन मध्ये थोडे तेल टाका तेल गरम झाले कि थोडे लसूण आणि कीरे टाकून परता . 
  • आता त्यात भरलेली वांगी टाका व पॅनला जरा हलवा जेणेकरून तेल सर्व वांग्यांना लागेल २ ते ३ मिनिटे वांगी परतल्यानंतर त्यात पाणी घाला . व आवश्यकता वाटत असल्यास मीठ टाका व १० १५ मिनिट शिजू घ्या . 
  • तुमची भरलेली वांगी तयार आहेत . 


Popular Posts

हॅप्पी भाग जएजी हिंदी फिल्म