साहित्य :
- पाणी - २ कप
- साखर - ४ चमचे किंवा आवश्यकतेनुसार
- चहा पावडर - २ छोटे चमचे
- दूध - १ काप किंवा आवश्यकतेनुसार
- छोटी वेलची - २ ते ३
- लवंग - २
- आले - १ छोटा तुकडा
कृती :
- एखाद्या खलामध्ये आले, छोटी वेलची, आणि लवंग बारीक करून घ्या . आणि बाजूला ठेवा .
- एखाद्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवा .
- पाणी उकळले की त्यात तयार पेस्ट टाका आणि २ ते ३ मिनिटांकरिता आणखी उकळू द्या .
- आता त्यात साखर टाका आणि चहापत्ती पावडर टाका व १ ते २ मिंटनकरिता उकळू द्या .
- आता त्यात दूध टाका व आणखी २ ते ३ मिनिटे उकळू द्या .
- तुमचा मसाला चहा तयार आहे, तो गरम गरम सर्व करा .