साहित्य :
- कच्ची केळी - ३ ते ४
- साखर - २५० ग्राम
- तूप - १ कप
- काजू - १/२ कप (बारीक तुकडे केलेले )
- दूध - २ कप
- वेलची - ३ ते ४ ( कुटून पूड केलेली )
कृती :
- कच्च्या केळींना धुऊन प्रेशर कुकरमध्ये एकाद कप पाणी टाकून १० मिनिटे (किंवा एक सिटी होईपर्यंत ) शिजून घ्या .
- तयार केळींची साल काढून वेगळी करा व एकाद प्याल्याने वा चमच्याने चांगले कुस्करून बाजूला ठेवा
- एका पॅन मध्ये तूप टाका तूप गरम झाले कि त्यात कुस्करलेली केळी परतून घ्या.
- त्यात साखर टाका आणि आणखी थोड्या वेळ परता .
- आता त्यात दूध व काजू टाका व मधून मधून हलवीत जरा घट्ट हिपर्यंत शिजवा .
- आता त्यात वेलची पावडर टाकून जरा परता .
- तुमचा कच्या केळांचा शिरा तयार आहे , गरमा गरम सर्व करा .