साहित्य :
- चिकन - १ किलो (मध्यम आकाराचे काप केलेले )
- बासमती तांदूळ - ५०० ग्राम (अर्धवट शिजलेले )
- अद्रक लसूण पेस्ट - १ छोटा चमचा
- लाल तिखट - २ छोटे चमचे ( किंवा आवश्यकतेनुसार )
- कांदा - २ ( बारीक काप करून तेलामध्ये हलका सोनेरी परतलेला)
- धने पूड - १/२ छोटा चमचा
- निंबू रस - २ छोटे चमचे
- दही - २०० ग्राम
- तेल - १/२ कप
- जिरे - १ छोटा चमचा
- दालचिनी - २ ते ३
- तेजपान - ३ ते ४
- शहाजिरे - १ छोटा चमचा
- मोठी वेलची - २ ते ३
- दगडफूल - १
- मिरे - १ छोटा चमचा
- कोथिंबीर - १/२ कप ( बारीक चिरलेली )
- हिरव्या मीरची - २ ते ३ (काप केलेली )
- हळद - २ छोटे चमचे
- तूप - १/२ काप
- केसर - ३ ते ४ धागे ( १/२ कप दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये भिजून ठेवलेले )
- मीठ - चवीनुसार
कृती :
- एक जाड बुडाच्या पातेल्यात चिकन चांगले धुऊन घ्या . आणि त्यात सर्व मसाला टाका, लाल तिखट , अद्रक लसूण पेस्ट , हळद , धने पूड , दही , कोथिंबीर , तळलेली कांदे , निंबू रस , हिरवी मिरची आणि थोडे तेल . व मिश्रण चांगले ढवळून घ्या . तयार मिश्रण २ ते ३ तासांकरिता बाजूला ठेवा .
- आता चिकनच्या पातेल्यामध्ये तांदूळ टाका व एक परत तयार करा .
- आता त्यावर थोडे तळलेली कांदे टाका , भिजवलेले केसर टाका , व वरून तूप पसरवा .
- पातेल्यावर झाकण ठेऊन त्याच्या कडा भिजवलेल्या कणकेच्या गोळ्याने बंद करा जेणेकरून बिर्याणी मधील वाफ बाहेर निघणार नाही .
- आता पातेल्याला ग्यास वर ठेऊन जवळ जवळ २० ते ३० मिनिटे शिजू द्या .
- ग्यास मंद करा व १० मिनिटे आणखी शिजू द्या जेणेकरून तांदूळ चांगला मुरेल
- तुमची हैद्राबादी चिकन बिर्याणी तयार आहे , आता झाकणाला बाजूला करून बिर्याणीला पूर्ण मिक्स न करता चमच्याने अलगत तांदूळ बाजूला करून चिकन हलके तपकिरी झाले की नाही हे पहा .