साहित्य :
- रवा - ५०० ग्राम
- साखर - ३ कप
- काजू - ५० ग्राम
- मनुका - ५० ग्राम
- खोबरे - १/२ कप (किसलेले )
- तूप - २०० ग्राम
कृती :
- सर्वप्रथम ग्यासवर पॅन ठेऊन तूप टाका, तूप गरम झालेकी रवा टाकून हलका तांबडा रंग होईपर्यंत परता .
- आता एका भांड्यात एक कप पाणी घ्या व त्यात साखर टाकून चाचणी बनवायला ठेवा .
- चाचणी दोन तरी झालीकी तिला भाजलेल्या रव्यामध्ये टाका खोबरे व काजू टाकून चांगले मिक्स करून घ्या .
- थोडे तूप हतला लावून मिश्रणाचा थोडासा भाग घेऊन हव्या त्या आकाराचे लाडू बनवायला घ्या .
- वरून सजावटीसाठी एक एक मनुका प्रत्येक लाडवावरती लावा
- तुमचे रव्याचे लाडू तयार आहे .