साहित्य :
- मुंग - २ कप
- कांदे - २ (बारीक चिरलेले)
- कढीपत्ता - १ ते २
- मोथिंबीर - १/२ कप (बारीक चिरलेला )
- हिंग - चिमटीभर
- लाल तिखट - १ छोटा चमचा (किंवा आवश्यकतेनुसार )
- धणेपूड - १ छोटा चमचा
- हळद - १ छोटा चमचा
- तेल - २ चमचे
- टोमॅटो- १ ( बारीक काप केलेला )
- जिरे - १ छोटा चमचा
- लसूण - १ ते २ पाकळी (बारीक काप लेलेला )
- पाणी - २ कप
- मीठ - चवीनुसार
कृती :
- सर्वप्रथम मुंगाला चांगले धुऊन ४ ते ५ तासाकरिता पाण्यामध्ये भिजत ठेवा . नंतर एक सुती कपड्यात बांधून पुन्हा ४ तासांकरिता बाजूला ठेवा जेणेकरून मुंगाला चांगले कोम येतील
- कोम आलेले मुंगाला चांगले धुऊन घ्या . व एका पातेल्यात काढा .
- आता एका पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवा . तेल गरम झाले की त्यात बारीक केलेली कांदे टाका . व हलका सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्या .
- आता त्यात लसूण, कढीपत्ता टाका व थोडे परतून घ्या .
- नंतर जिरे , लाल तिखट , हिंग . हळद व धणेपूड टाकून परता .
- आता त्यात टोमॅटो टाका व थोड्यावेळ आणखी परता आणि मुंग टाका व मिक्स करा .
- नंतर त्यात पाणी टाका व मीठ टाकून १० मिनिटे शिजू घ्या .
- आता चमच्याच्या मदतीने थोडे मुंग घेऊन ते ववर्स्थित शिजले की नाही याची खात्री करून ग्यास बंद करा
- तुमची .मुंगाची उसळ तयार आहे, बारीक चिरलेल्या कोथिंबिरीने वरून सजवा व ग्राम गरम सर्व करा .