साहित्य :
- निंबू - १/२ किलो
- लाल तिखट - १०० ग्राम ( किंवा आवश्यकतेनुसार )
- मीठ - २०० ग्राम
- हळद - २ छोटा चमचा
- हिंग - १ छोटा चमचा
कृती :
- सर्वप्रथम निंबू चांगले धूऊन पाण्यामध्ये ४ ते ५ भिजत ठेवा . नंतर निंबू बाहेर काढून साफ कपड्याने पुसून घ्या व थोडे सुकू द्या .
- आता एक स्वच्छ पातेलं घेऊन उकडलेल्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या . व कपड्याने पुसून कोरडे करा .
- आता त्यात निंबाचे हव्या त्या आकाराचे काप करून टाका . काप करतानाच निंबातल्या बिया वेगळ्या करून घ्या. त्यात लाल तिकट , हिंग आणि मीठ टाकून कोरड्या चमचायने चांगले ढवळून घ्या .
- एखादी काचेची बरणी घेऊन ती सुद्धा उकळलेल्या पाण्याने स्वच्छ धुऊन कोरडी करा .
- आता तयार मिश्रण बरणीत टाकून जवळ जवळ २० ते २५ दिवस ठेवा . दरम्यान एक ते दोन दिवसाने निंबाच्या लोणच्याला हलवीत चला जेणेकरून निंबाचे लोणचे समप्रमाणात तयार व्हायला मदत होईल .
- तुमचे निंबाचे लोणचे तयार आहे.