रेसिपी शोधा

कैरीचे लोणचे - Kairiche (Aamba) Lonche


NEW BOLLYWOOD MOVIE

कैरीचे लोणचे - Kairiche (Aamba) Lonche

साहित्य : 
  • कच्च्या कैऱ्या (आंबे) - १ किलो 
  • हिंग पावडर - १/२ छोटा चमचा 
  • हळद - ५० ग्राम 
  • लाल तिखट - ५० ग्राम (किंवा आव्श्क्तेनुसार )
  • मोहरीची डाळ - ५० ग्राम 
  • सोप - २ मोठी चमचे 
  • सरसो तेल - २०० ग्राम 
  • मीठ - १०० ग्राम (किंवा आव्श्क्तेनुसार )
कृती :
  • सर्व प्रथम कैर्या चांगल्या पाण्याने धूऊन घ्या व एका भांड्यात त्या पूर्ण दुबेल येवढे पाणी टाकून जवळ जवळ एक रात्र बाजूला ठेवा . 
  • आता कैऱ्या पाण्याच्या बाहेर काढून जरा सुकून घ्या . व चाकूने हव्या त्या आकाराचे काप करून घ्या . 
  • कढईत तेल गरम करायाला ठेवा . तेल गरम झालेकी ग्यास बंद करा व त्यात मोहरीची डाळ , हळद , लाल तिखट , हिंग , मीठ आणि काप केलेल्या कैऱ्या टाकून चांगले चमच्याने ढवळून घ्या . व थोड्या वेळा करिता झाकून बाजूला ठेवा . 
  • आता तयार लोणच्याला काचेच्या बरणीत भरून जवळ जवळ एका आठोड्या करिता उनेम्ध्ये ठेवा . मधून मधून चमच्याने लोणचे खालीवर करीत चला . 
  • तुमचे कैरीचे लोणचे तयार आहे . 

वाटाणा गाजर भाजी - Watana Garar Bhaji

वाटाणा गाजर भाजी - Watana Garar Bhaji

साहित्य :
  • गाजर - २ मोठे ( सोलून छोटे तुकडे केलेले )
  • सोललेला वाटाणा - २०० ग्राम 
  • टमाटे - २ मोठे ( बारीक काप केलेले )
  • जिरे - १/२ छोटा चमचा 
  • आले पेस्ट - १/२ छोटा चमचा 
  • हिरवी मिरची - १ ( काप केलेली )
  • हळद - १/२ छोटा चमचा 
  • लाल तिखट - १/२ छोटा चमचा 
  • धणे पावडर - १/२ छोटा चमचा 
  • हिंग - १/४ छोटा चमचा 
  • तेल - २ मोठा चमचा 
  • मीठ - आव्श्क्तेनुसार 
कृती :
  • एका कढईत तेल गरम करायला ठेवा . तेल गरम झाले कि त्यात जिरे , हळद , हिंग , आले पेस्ट , धणे पावडर व हिरवी मिरची टाकून परतून घ्या . 
  • आता त्यात गाजर , वाटाणा , लाल टिकट आणि मीठ टाका व आर्धा कप पाणी टाकून सर्व मिश्रणाला मिक्स करा. भाजीला चांगले शिजू द्या . 
  • भाजी चांगली शिजल्यानंतर त्यात टमाटे टाकून आणखी २ मिनिटाकरिता आणखी शिजू द्या . 
  • भाजी चांगली शिजल्या नंतर ग्यास बंद करा व एका पतेलात काढून थोड्या हिरव्या कोथिंबीरने सजवा . 

खोब्रा बेसन बर्फी - Coconut besan barfi

खोब्रा बेसन बर्फी - Coconut besan barfi

साहित्य :
  • बेसन - १०० ग्राम 
  • साखर - ५०० ग्राम 
  • खोबरे - २०० ग्राम ( बारीक किसलेले )
  • छोटी वेलची - ५ ते ६ (कुटून बारीक पावडर केलेली )
  • तूप - २०० ग्राम 
  • दुध - १ कप 
  • काजू - ५० ग्राम ( छोटे छोटे तुकडे केलेले)
  • मीठ - चिमुटभर 
कृती :
  • एका कढइत तूप टाका, तूप गरम झालेकी बेसन निरंतर ढवळीत थोडा तपकिरी रंग येईपर्यंत भाजून बाजूला ठेवा . 
  • आता त्याच कढईत खोबरे थोडे परतून घ्या व बाजूला ठेवा . 
  • एका पातेल्यामध्ये साखर आणि दुध टाकून पाक बनवायला ठेवा . दोन तारी पाक तयार झाला कि त्यात बेसन , खोबरे, वेलची पावडर, काजू आणि थोडे मीठ टाका . व चांगले मिक्स करून घ्या . 
  • दरम्यान एका प्लेटला थोडे तूप लाऊन तयार ठेवा . तयार मिश्रण त्या प्लेटमध्ये टाका व व्यवस्थित पसरून घ्या . व थंड व्हायला ठेवा 
  • बर्फी थंड झाली कि चाकूने हव्या त्या आकारात कापून घ्या . 

चिंचेची चटणी - Chinchechi Chatni

चिंचेची चटणी - Chinchechi Chatni

साहित्य :
  • चिंच - ५० ग्राम (बी काढलेली )
  • गुळ - ५० ग्राम (अव्श्क्तेनुसार )
  • लाल तिखट - १ छोटा चमचा 
  • मीठ -  (अव्श्क्तेनुसार )
कृती :
  • सर्वप्रथम चिंचेला चांगले धून घ्या . प्रेशर कुकर मध्ये चिंच, गुळ आणि थोड पाणी टाकून ऐक ते दोन शिट्टी होऊ द्या . 
  • आता तयार मिश्रणाला मिक्सी मध्ये चांगले बारीक करून घ्या . तयार मिश्रणाला एखाद्या सुती कापडाने गळून घ्या . तयार मिश्रणात थोडे लाल तिखट आणि मीठ टाकून चांगले मिक्स करा . 
  • तुमची चिंचेची चटणी तयार आहे . 

लसुन चटनी - Garlic Chutney

लसुन चटनी - Garlic Chutney

साहित्य :
  • लसून - ५० ग्राम 
  • लाल तिखट - २ ते ३ छोटा चमचा ( किंवा आव्श्क्तेनुसार )
  • निंबू - १
  • जिरे - १ छोटा चमचा 
  • मीठ - आव्श्क्तेनुसार 
कृती :
  • लसणाला सोलून , सर्व लसुन , लाल तिखट, जिरे व मीठ टाकून मिश्रण मिक्सी मध्ये वा खलामध्ये चांगले बारीक करून घ्या . 
  • आता तयार मिश्रणात निंबू पिळून चांगले मिक्स करा . 
  • तुमची लसुन ची चटणी तयार आहे . खलात कुटून बारीक केलेली चटणी अधिक चवदार लागते . 
  • तयार चटणी ब्रेडसोबत वा पोळी सोबत खाऊ शकता . 

पनीर पुलाव - Paneer Pulao

पनीर पुलाव - Paneer Pulao


साहित्य :
  • तांदूळ - ५०० ग्राम 
  • पनीर - २५० ग्राम (काप केलेले )
  • गाजर - २ छोटे ( छोटे छोटे काप केलेले )
  • हिरवा वटाना - २५० ग्राम 
  • तेल - २५० ग्राम 
  • जिरे - १ छोटा चमचा 
  • कांदा - १ मोठा ( बारीक चिरलेला )
  • अद्रक लहसून पेस्ट - १ छोटा चमचा 
  • कोथिम्बिर - १/२ कप (बारीक चिरलेली )
  • निंबू - १
  • मीठ- आव्श्क्तेनुसार 
मसाला बनविण्यासाठी :
  • मोठी वेलची - २ ते ३
  • छोटी वेलची - २
  • लवंग - ३ ते ४
  • मिरे- १०
  • दालचिनी - १
  • शहाजिरे - १ छोटा चमचा 
कृती :
  • सर्वप्रथम तांदूळ चांगले धून घ्या . व एका भांड्यात पूर्ण दुबेल आसे पाणी टाकून आर्धा तासाकरिता बाजूला ठेवा . नंतर बाहेर काढून चांगले शिजून घ्या . 
  • एका प्यान मध्ये थोडे तेल टाका.  तेल गरम झाले कि काप केलेले तुकडे तळायला टाका व हलका सोनेरी रंग होईपर्यंत दोन्ही बाजूने तळून घेऊन एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवा . 
  • आता त्याच तेलात सर्व मसाले म्हणजे मोठी वेलची , छोठी वेलची , दालचिनी , लवंग . मिरे , शहाजिरे , जिरे व बारीक चिरलेला कांदा २ मिनिटे भाजून घ्या . व एका प्लेटमध्ये काढून ठेवा . तयार मिश्रण थंड झालेकी थोडे जाडसर कुटून घ्या . 
  • एका प्यान मध्ये थोड तेल टाका , तेल गरम झालेकी त्यात अद्रक लहसून चा पेस्ट, तयार मसाला टाका व थोड भजून घ्या . आता त्यात हिरवा वाटणा व गाजर टाका . मिश्रणाला चांगले मिक्स करून जवळ जवळ २ मिनिटांकरिता झाकून शिजू द्या . 
  • आता तयार मिश्रणात शिजलेले तांदूळ आणि तळलेले पनीरचे तुकडे, मीठ आणि निंबू रस  टाकून चांगले मिक्स करून घ्या . 
  • तुमचा पनीर पुलाव तयार आहे . थोड्या वेळ शिजू देऊन पुलावला एका प्लेटमध्ये काढा व थोडी कोथिम्बिर टाकून सजवा 

गाजर बर्फी - Carrot Burfi Recipe

गाजर बर्फी - Carrot Burfi Recipe

साहित्य :
  • गाजर - ५०० ग्राम 
  • क्रीम दुध - १ लिटर 
  • वेलची - ५ ते ६ ( कुटून बारीक पावडर केलेली )
  • तूप - १०० ग्राम 
  • साखर - २५० ग्राम किवा आव्श्क्तेनुसार 
  • काजू - ५० ग्राम ( तुकडे केलेले )
कृती :
  • सर्वप्रथम गाजर चांगले धून घेऊन बारीक किस करून घ्या . 
  • एका भांड्यात दुध गरम करायला ठेवा दुध गरम झाले कि त्यात गाजर टाका व दुध पूर्णतः आटे पर्यंत शिजू द्या . मधन मधन ढवळत चला जेणेकरून गाजर खाली लागणार नाही . 
  • गाजर मिश्रण चांगले घट्ट झालेकी त्यात वेलची पावडर, निम्मे काजू व तूप टाकून निरंतर ढवळीत थोड्यावेळ सिजु द्या . 
  • आता त्यात साखर टाका व चांगले मिक्स करा . साखरेचे पाणी पूर्ण आटेपर्यंत मिश्रणाला निरंतर ढवळीत राहा . 
  • दरम्यान एका प्लेटला थोडे तूप लाऊन गुळगुळीत करा . मिश्रण चांगले घट्ट झालेकी ते या प्लेटमध्ये पसरवा व उरलेल्या काजूच्या तुकड्यांनी सजवा . व थंड व्ह्यायला बाजूला ठेवा . 
  • मिश्रण थंड झाले कि चाकूच्या मदतीने हव्या त्या आकाराचे काप करून वेगळे करा . 
  • तुमची गाजर बर्फी तयार आहे . 

Popular Posts

हॅप्पी भाग जएजी हिंदी फिल्म