साहित्य :
- गव्हाचे पीठ - ५०० ग्राम
- मुळा - १ १/२ कप (बारीक किसलेला )
- लाल तिखट - २ छोटे चमचे
- हळद - १ छोटा चमचा
- आले पेस्ट - २ चमचे
- ओवा - १ छोटा चमचा
- हिरवी मिरची - २ ते ३ (बारीक चिरलेली )
- कोथिंबीर - १/२ कप (बारीक चिरलेली )
- तेल - १ कप
- मीठ - चवीनुसार
कृती :
- एका भांड्यात गव्हाचे पीठ घ्या . त्यात किसलेला मुळा , दोन चमचे तेल, ओवा , हिरवी मिरची , आले पेस्ट , लाल तिकट , हळद, कोथिंबीर आणि मीठ टाकून थोडे थोडे पाणी टाकीत घट्ट असे मळा . व जवळ जवळ १० ते २० मिनिटांकरिता बाजूला ठेवा .
- आता तयार कणकेचा एक गोळा घेऊन पोळी लाटायला घ्या . थोडे तेल लाऊन पोळीला पलटा व पुन्हा तेल लावून पलटवीत त्रिकोणी आकाराची पोळी तयार करा . व थोडी लटा
- ग्यासवर पॅन ठेवा थोडे तेल टाका तेल गरम झालेकी तयार पोळी त्यावर टाका व हलका तांबडा रंग झालाकी पलटा व दोन्ही बाजूने चांगले शेकून घ्या .
- तुमचे मुळ्याचे पराठे तयार आहेत , याना गरमा गरम सर्व करा .