रेसिपी शोधा

मिल्क केक - Milk Cake

मिल्क केक - Milk Cake
NEW BOLLYWOOD MOVIE

साहित्य :

  • दूध - ३ लिटर 
  • काजू - ५० ग्राम (बारीक तुकडे केलेले )
  • साखर - ३०० ग्राम 
  • निंबू रस - २ छोटे चमचे 
  • वेलची पावडर - २ छोटे चमचे (५ ते ६ वेलची बारीक कुटलेली)
  • तूप - १ छोटा चमचा 
कृती :
  • सर्वप्रथम एका मोठ्या पातेल्यात दूध आटवायला ठेवा व मधून मधून हलवीत रहा . दूध जवळ जवळ १/४ राहील एवढे आटऊन घट्ट करा . 
  • आता त्यात निंबू रस टाकून आणखी थोड्या वेळ हलवीत घट्ट करा. 
  • दूध चांगले घट्ट झालेकी त्यात साखर टाकून मिक्स करा व दूध चांगले जमेल असे होईपर्यंत आणखी शिजवा . मिश्रण चांगले हलवीत रहा जेणेकरून ते खाली पातेल्याला लागू नये . 
  • आता त्यात वेलची पावडर आणि काजूचे तुकडे टाका एकदम मंद आचेवर थोड्यावेळ शिजवा . 
  • दरम्यान एका छोटया पातेल्याला आतून तूप लावा . 
  • आता तयार मिश्रण पातेल्यात टाका व चांगले भरून अर्ध्या तासाकरिता बाजूला ठेवा . 
  • आता पातेल्याच्या कडा चाकूच्या मदतीने मोकळ्या करा व पातेलं प्लेटमध्ये पालटे करून हाताने थोडी थाप देऊन केक मोकळा करा . 
  • तुमचा मिल्क केक तयार आहे. आता त्याचे हव्या त्या आकाराचे काप करून वेगळे करा . 

Popular Posts

हॅप्पी भाग जएजी हिंदी फिल्म