साहित्य :
- डार्क चॉकलेट (डार्क कंपाउंड) - ५००ग्राम
- व्हाईट चॉकलेट (व्हाईट कंपाउंड ) - २०० ग्राम
- काजू - ५० ग्राम
- बदाम - ५० ग्राम
कृती :
- डार्क आणि व्हाईट चॉकलेटचे चाकूच्या मदतीने बारीक तुकडे करून घ्या.
- एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवा पाणी थोडे गरम झालेकी ग्यास एकदम मंद करून घ्या .
- एका दुसऱ्या पातेल्यात दोन्ही चॉकलेट टाकून ते पातेलं गरम पाण्यात ठेवा .
- चमच्याने निरंतर हलवीत रहा . चॉकलेट वितळायला लागेल , चॉकलेट पूर्ण वितळून झाले कि पातेलं पाण्याच्या बाहेर काढा .
- दरम्यान काजू व बदाम थोडे पॅन मध्ये भाजून घ्या जेणेकरून त्यातली नमी निघून जाईल
- चॉकलेटच्या साच्यामध्ये एक एक काजू ठेऊन चमच्याने चॉकलेट त्यात टाका व सर्व साचे भरून झालेकी साच्याला थोडे हलवा जेणेकरून चॉकलेट समांतर रीतीने साच्यामध्ये बसेल
- चॉकलेट जमल्यानंतर एक एक चॉक्लेटला बाहेर काढा व चॉकलेट पेपर ने सजवा