रेसिपी शोधा

प्रसादाची बुंदी - Prasad Boondi

प्रसादाची बुंदी - Prasad Boondi
NEW BOLLYWOOD MOVIE



साहित्य :
  • उडदाची डाळ - १/२ कप 
  • साखर - ४ कप 
  • मैदा - २०० ग्राम 
  • काजू - ५० ग्राम (तुकडे केलेले)
  • केसर - ६ ते ७ धागे ( थोड्या गरम दुधामध्ये थोडया वेळ भिजवलेले )
  • वेलची - ४ ते ५ (कुटून पूड केलेली )
  • तेल - तळण्याकरिता 
कृती :
  • सर्वप्रथम उडदाच्या डाळीला चांगली धुऊन २ ते ३ तासांकरिता पाण्यात भिजत ठेवा . नंतर पूर्ण पाणी काढून घ्या . 
  • आता तयार डाळीला मिक्सरमध्ये चांगली बारीक करून घ्या . 
  • आता एका पातेल्यात १  १/२ कप पाणी टाका आणि त्यात साखर टाकून चाचणी बनवायला ठेवा . 
  • दरम्यान एका भांड्यात बारीक केलेली डाळ च्या , त्यात मैदा टाका व केसचे दूध टाकून फेटा . 
  • थोडे थोडे पाणी टाकीत सर्व गाठी काढीत मिश्रण चांगले ढवळून घ्या . मिश्रण खूप जास्ती पातळ किंवा घट्ट होता काम नये . 
  • तयार चाचणीला चमच्याने ढवळीत बुडविलेला चमचा थोडा वर उचला आणि पडणाऱ्या थेंबाचा तार तुटतोय कि नाही हे चेक करा . व तयार चाचणीला ग्यासच्या खाली उतरून ठेवा . चाचणी थोडी गरमच राहील याची काळजी घ्या . 
  • आता पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवा . तेल चांगले गरम झाले कि एकाद्या झारीला पॅनवर उलटे पकडून थोडे थोडे मिश्रण हाताने झर्यावरती पसरवीत तेलात बुंदी तळा. 
  • बुंदी हलकी सोनेरी झालीकी गरम गरमच तेलातून काढून चाचणीत टाका व ५ ते ६ मिनिटे ठेवा व एखाद प्लेटमध्ये काढून थंड होऊ द्या . 
  • काजूचे तुकडे बुंदी गरम असतांनाच टाकून मिक्स करून घ्या . 
  • तुमची प्रसादाची बुंदी तयार आहे . 

कच्या केळांचा शिरा - Kchya Kelancha Shira

कच्या केळांचा शिरा - Kchya Kelancha Shira
NEW BOLLYWOOD MOVIE



साहित्य :
  • कच्ची केळी - ३ ते ४
  • साखर - २५० ग्राम 
  • तूप - १ कप 
  • काजू - १/२ कप (बारीक तुकडे केलेले )
  • दूध - २ कप 
  • वेलची - ३ ते ४ ( कुटून पूड केलेली )
कृती :
  • कच्च्या केळींना धुऊन प्रेशर कुकरमध्ये एकाद कप पाणी टाकून १० मिनिटे (किंवा एक सिटी होईपर्यंत ) शिजून घ्या . 
  • तयार केळींची साल काढून वेगळी करा व एकाद प्याल्याने वा चमच्याने चांगले कुस्करून बाजूला ठेवा 
  • एका पॅन मध्ये तूप टाका तूप गरम झाले कि त्यात कुस्करलेली केळी परतून घ्या. 
  • त्यात साखर टाका आणि आणखी थोड्या वेळ परता . 
  • आता त्यात दूध व काजू टाका व मधून मधून हलवीत जरा घट्ट हिपर्यंत शिजवा . 
  • आता त्यात वेलची पावडर टाकून जरा परता . 
  • तुमचा कच्या केळांचा शिरा तयार आहे , गरमा गरम सर्व करा . 

राजगिरा लाडू - Rajgira Ladoo

राजगिरा लाडू - Rajgira Ladoo
NEW BOLLYWOOD MOVIE



साहित्य :
  • राजगिरा - २०० ग्राम 
  • गूळ किंवा साखर - २०० ग्राम (बारीक केलेला)
  • काजू - ५० ग्राम (बारीक तुकडे केलेले)
  • तूप - २ चमचे 
कृती :
  • पॅन ग्यासवर ठेवा व गरम होऊ घ्या . 
  • पॅन गरम झाले कि एक दोन चमचे राजगिरा त्यावर टाकीत राजगिरा चांगला फुलेपर्यंत हलवीत रहा . 
  • फुललेला राजगिरा एका भांडयात काढा व चाळणीने चाळून नफुललेला राजगिरा वेगळा करा . 
  • आता पॅन मध्ये तूप टाका व ते गरम झालेकी त्यात गूळ टाका , गूळ हळू हळू वितळायला लागेल 
  • गुल पूर्ण वितळला कि त्यात थोडे पाणी टाकून चाचणी तयार करा . 
  • तयार चाचणीला राजगिऱ्यामध्ये टाका , काजूचे तुकडे टाका व चांगले मिक्स करून घ्या . 
  • हातांना थोडे पाणी लाऊन गरम गरम मिश्रणाचे हव्या त्या आकाराचे लाडू बांधून घ्या. 

भरली वांगी - Bharli Vangi

भरली वांगी - Bharli Vangi
NEW BOLLYWOOD MOVIE



साहित्य :
  • हिरवी काटेरी वांगी - २५० ग्राम (छोट्या आकाराची )
  • शेंगदाणे - १ कप (भाजून बारीक पूड केलेले )
  • तीळ - २ चमचे (हलकी भाजलेली )
  • लसूण - ३ पाकळ्या (काप केलेले)
  • आले - १ छोटा तुकडा 
  • कांदा - १ मध्यम आकाराचा (बारीक चिरलेला)
  • कोथिंबीर - १/२ कप (बारीक चिरलेली )
  • टोमॅटो - १ (काप केलेला)
  • लाल तिखट - १ ते २ छोटे चमचे (किंवा आवश्यकतेनुसार )
  • हळद - १ छोटा चमचा 
  • धणेपूड - १ छोटा चमचा 
  • जिरे - १ १/२ छोटा चमचा 
  • हिंग - चिमूटभर 
  • तेल - २ मोठे चमचे 
  • पाणी - २ कप 
  • मीठ - चवीपुरते 

कृती :

  • सर्वप्रथम वांगी चांगली धुऊन घ्या . व त्यांचे देठ शाबूत ठेऊन खालच्या बाजूने ४ काप करा. 
  • नंतर पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवा . तेल गरम झालेकी त्यात कांदा थोडा सोनेरी रंग होईपर्यंत परता . 
  • आता त्यात जिरे , हळद , लालतिकाट , हिंग व धणेपूड टाका व थोडे परतून घ्या . 
  • त्यात आता टोमॅटो आणि मीठ टाकून थोड्या वेळ आणखी मिक्स करीत रहा . 
  • आता ग्यास बंद करा व मिक्सी मध्ये शेंगदाणे , तीळ , आले , लसूण , कोथिंबीर आणि तयार मिश्रण चांगले बारीक करून घ्या . 
  • तयार मिश्रण वांग्यांच्या कपांमध्ये भरायला सुरवात करा . 
  • पुन्हा त्याच पॅन मध्ये थोडे तेल टाका तेल गरम झाले कि थोडे लसूण आणि कीरे टाकून परता . 
  • आता त्यात भरलेली वांगी टाका व पॅनला जरा हलवा जेणेकरून तेल सर्व वांग्यांना लागेल २ ते ३ मिनिटे वांगी परतल्यानंतर त्यात पाणी घाला . व आवश्यकता वाटत असल्यास मीठ टाका व १० १५ मिनिट शिजू घ्या . 
  • तुमची भरलेली वांगी तयार आहेत . 


आळू वडी - aluvadi

आळू वडी - aluvadi
NEW BOLLYWOOD MOVIE


साहित्य :
  • आळूची कोवळी पाने - ५ ते १० ( मध्यम आकाराचे )
  • बेसन - १ कप 
  • तांदळाचे पीठ - १/२ कप 
  • गुळ - १/२ मोठा चमचा (बारीक केलेला )
  • तेल - १ मोठा चमचा 
  • हिंग - चिमटीभर 
  • ओवा - १ छोटा चमचा 
  • हळद - १ छोटा चमचा 
  • धणेपूड - १ छोटा चमचा 
  • लाल तिखट - १ छोटा चमचा किंवा आवश्यकतेनुसार 
  • जिरे - १छोटा चमचा 
  • हलके भाजलेले तीळ - १ मोठा चमचा 
  • कोथिंबीर - १/४ कप (बारीक चिरलेली )
  • मीठ - चवीपुरते 
कृती :
  • सर्वप्रथम आळूच्या पानांना चांगले धुऊन, त्याच्या दांड्या तोडून बाजूला ठेवा . 
  • आता एका भांड्यात बेसन घ्या त्यात तांदळाचे पीठ, कोथिंबीर , तेल , जिरे, हिंग, हळद , धणेपूड , लालतिखट , तीळ, गूळ , व मीठ टाकून थोडे थोडे पाणी टाकीत घट्ट आसे मिश्रण तयार करा . 
  • एक आळूच पान घ्या, उलटी बाजूने टोक खालच्या राहील असे ठेऊन त्यावर तयार मिश्रणाचा हाताच्यामदतीने एक हलका थर लावा . व आणखी एक आळूचे पान घेऊन उलटे त्यावर ठेवा . व त्यावरही मिश्रण लावा 
  • असे ४ ते ५ पाने एकावर एक लावून उजव्या आणि डाव्या बाजूच्या कडा मोडून घ्या . व त्यावरही मिश्रण लावा . 
  • आता वरच्या बाजूने मोडीत पानांची गोल घडी तयार करा . 
  • तयार पानांना वाफवण्यासाठी प्रेशर कुकर मध्ये खालच्या भांडयात पाणी घेऊन त्यावर एखाद प्लेट ठेवा व सर्व पानांच्या घड्या त्यावर ठेवा . 
  • प्रेशर कुकरच झाकण विना सिटीचा लावून घ्या . व १५ मिनिटे वाफवा . 
  • नंतर चाकूच्या मदतीने छोटे छोटे स्लाइस कापून घ्या . 
  • पॅन मध्ये तेल ग्राम करायला ठेवा व तयार वड्या हलका तपकिरी रंग होईपर्यंत तळून घ्या . 
  • तुमच्या अळूच्या वड्या तयार आहेत, गरमा गरम सर्व करा 

मुंगाची उसळ - Mungachi Usal

मुंगाची उसळ - Mungachi Usal
NEW BOLLYWOOD MOVIE



साहित्य :
  • मुंग - २ कप 
  • कांदे - २ (बारीक चिरलेले)
  • कढीपत्ता - १ ते २
  • मोथिंबीर - १/२ कप (बारीक चिरलेला )
  • हिंग - चिमटीभर 
  • लाल तिखट - १ छोटा चमचा (किंवा आवश्यकतेनुसार )
  • धणेपूड - १ छोटा चमचा 
  • हळद - १ छोटा चमचा 
  • तेल - २ चमचे 
  • टोमॅटो- १ ( बारीक काप केलेला )
  • जिरे - १ छोटा चमचा 
  • लसूण - १ ते २ पाकळी (बारीक काप लेलेला )
  • पाणी - २ कप 
  • मीठ - चवीनुसार 
कृती :
  • सर्वप्रथम मुंगाला चांगले धुऊन ४ ते ५ तासाकरिता पाण्यामध्ये भिजत ठेवा . नंतर एक सुती कपड्यात बांधून पुन्हा ४ तासांकरिता बाजूला ठेवा जेणेकरून मुंगाला चांगले कोम येतील 
  • कोम आलेले मुंगाला चांगले धुऊन घ्या . व एका पातेल्यात काढा . 
  • आता एका पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवा . तेल गरम झाले की त्यात बारीक केलेली कांदे टाका . व हलका सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्या . 
  • आता त्यात लसूण, कढीपत्ता टाका व थोडे परतून घ्या .  
  • नंतर जिरे , लाल तिखट , हिंग . हळद  व धणेपूड टाकून परता . 
  • आता त्यात टोमॅटो टाका व थोड्यावेळ आणखी परता  आणि मुंग टाका व मिक्स करा . 
  • नंतर त्यात पाणी टाका व मीठ टाकून १० मिनिटे शिजू घ्या . 
  • आता चमच्याच्या मदतीने थोडे मुंग घेऊन ते ववर्स्थित शिजले की नाही याची खात्री करून ग्यास बंद करा
  • तुमची .मुंगाची उसळ तयार आहे, बारीक चिरलेल्या कोथिंबिरीने वरून सजवा व ग्राम गरम सर्व करा . 

सांबर - Sambar Recipe

सांबर - Sambar Recipe
NEW BOLLYWOOD MOVIE



साहित्य :
  • तुळीची डाळ - २५० ग्राम 
  • लाल तिखट - १ छोटा चमचा 
  • हिंग- १ छोटा चमचा 
  • हळद - १ छोटा चमचा 
  • कोथिंबीर - १/२ कप (बारीक चिरलेली)
  • चिंचेचा गर - ५० ग्राम 
  • टोमॅटो - २ (बारीक काप केलेले)
  • बटाटे - २ (बारीक काप केलेले)
  • कांदा - १ (बारीक चिरलेला)
  • वांग - १ ते २ (बारीक केलेलं)
  • तेल - २ ते ३ छोटे चमचे 
  • शेवग्याच्या शेंगा - १ ते २ ( तुकडे केलेल्या )
  • लाल मिरची - २ ते ३
  • राई - १ छोटा चमचा 
  • लसूण - १ ते पाकळ्या ( बारीक काप केलेला )
  • कढीपत्ता - ५ ते ६
  • मीठ - चवीपुरते 
कृती :
  • सर्वप्रथम तुळीच्या डाळीला चांगली धुऊन प्रेशर कुकर मध्ये २ ते ३ कप पाणी टाकून शिजून घ्या. 
  • दरम्यान एका प्याल्यात थोडे गरम पाणी घेऊन चिंच जवळ जवळ अर्ध्या तासाकरिता भिजत ठेवा . 
  • आता त्यात टोमॅटो, बटाटे, कांदा , शेवग्याच्या शेंगा , वांग टाकून आणखी एखाद सिटी होऊ घ्या . 
  • आता त्यात थोडे पाणी आणि चिंचेचा गर टाकून मधून मधून ढवळीत १५ मिनिटे मंद आचेवर शिजू घ्या . 
  • फोडणी देण्यासाठी एका पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवा . त्यात मोहरी टाकून जरा परता , त्यात लसूण , लाल मिरची , कढीपत्ता व हिंग टाकून लसूण हलका सोनेरी होईपर्यंत आणखी थोड्या वेळ परता . 
  • आता त्यात तयार डाळीचे मिश्रण टाकून ५ मिनिटे उकळवा . 
  • तुमचा गरमा गरम सांबर तयार आहे . वरण थोडी कोथिंबीर टाकून सजवा . 

Popular Posts

हॅप्पी भाग जएजी हिंदी फिल्म