साहित्य :
- तळण्यासाठी 3 कप तेल
- 2 टेस्पून पाणी
- 12 टेस्पून बेसन
- 4 टेस्पून तांदूळ पिठ
- 1 टेस्पून हळद
- 1 टेस्पून लाल तिखट
- 1 टेस्पून जिरे
- 1 टेस्पून ओवा पावडर
- दिड टेस्पून बेकिंग सोडा
- चविनुसार मीठ
कृती -
- सर्वप्रथम बेसन आणि तांदूळाच्या पिठाला चाळून घ्या . नंतर त्यात मीठ, लाल तिखट, जिरे, ओवा पावडर , हळद आणि बेकिंग सोडा टाका सर्व छान मिक्स करा .
- आता थोडे पाणी घालून मिश्रणाला चांगले मळून घ्या . तयार झालेला कणकीचा गोळा मऊ आणि गुळगुळीत असायला हवा . मिश्रणात जास्ती पाणी टाकल्या जाणार नाही याची काळजी घ्या .
- आता तयार झालेल्या गोळ्याला एका ओलसर कापडाने गुंडाळून १५ मिनिटांकरिता बाजूला ठेवा .
- चकली मेकरला थोडे तेल लाऊन शेव बनविण्याचा साचा जोडा . नंतर तयार झालेल्या कणकीच्या गोळ्याचा थोडा तुकडा तोडून त्यात टाका . तसेच एक पॅन किंवा कढई घेऊन त्यात तेल टाकून मध्यम आचेवर गरम करायला ठेवा .
- तेल खूप जास्ती गरम होणार नाही याची काळजी घ्या . आता चकली मेकरला पॅनवर धरून हाताचा दाब वाढवीत गोलाकार आकारामध्ये फिरवा .
- शेव चांगले कुरकुरीत हलके लाल होईपर्यंत दोन्ही बाजूने तळा व काढून एका प्लेट मध्ये ठेवा .
- थंड झाल्यावर एका हवाबंद डब्यात त्यांना भरून तुम्ही एका आठवडयापर्यंत खाऊ शकता .