रेसिपी शोधा

तवा पुलाव - Tawa Pulao

भात बनविण्याकरिता :
 • 1 कप बासमती तांदूळ
 • 4 - 5 कप पाणी
 • तेल - आव्शक्तेनुसर 
 • मीठ - आव्शक्तेनुसर
मसाला बनविण्याकरिता :
 • 1 मध्यम आकाराची चिरलेली शिमला मिरची 
 • 2 मोठे टोमॅटो - 150 ग्रॅम, चिरलेले 
 • 1 मध्यम आकाराचा कांदा - 50 ग्रॅम , चिरलेले 
 • 1 टिस्पून आलेलसूण ची पेस्ट
 • ¼ टिस्पून लाल तिखट
 • ¼ चमचा हळद
 • 2 टिस्पून पाव भाजी मसाला
 • दिड टिस्पून जिरे
 • 2 टेस्पून तेल किंवा बटर किंवा दोन्ही अर्धा - अर्धा
 • १ लहान मध्यम आकाराचे गाजर चिरलेले 
 • 1 मध्यम आकाराचा चिरलेला बटाटा,
 • दिड कप हिरवे मटार
 • दिड टिस्पून लिंबाचा रस
 • कोथिंबीर - चिरलेली 
 • मीठ - आव्श्क्तेनुसार 
कृती -

भात बनविण्याकरिता :

 • सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ पाण्यानी धून घ्या जेणेकरू त्यातला सर्व स्टार्च निघून जाईल . 
 • एका भांड्यामध्ये पुरेसे पाणी घेऊन त्यात तांदूळ २० ते ३० मिनिटे भिजत ठेवा व नंतर काढून एखाद्या दुसरया भांड्यामध्ये काढून बाजूला ठेवा . 
 • आता तांदुळात पाणी टाकून आव्शक्तेनुसर मीठ आणि तेलाची काही थेंब टाका . व चांगल्या पद्धतीने सिजवा जेणेकरून तांदळाचा प्रत्येक कण वेगळा आणि शिजलेला असेल . 
 • आता गाळण्याच्या मदतीने शिजवलेल्या भातातील सर्व पाणी काढून घ्या . 
 • एका भांड्यात भात पसरून सर्व स्टीम (वाफ) बाहेर निघाल्या वर एका भांड्याने झाकून ठेवा . 
मसाला बनविण्याकरिता :


 • एका प्रेशर कुकर मध्ये गाजर, बटाटा आणि मटार शिजवून घ्या . व बटाट्याला सोलून बटाटा आणि गाजराला चिरून बाजूला ठेवा . 
 • आता एका कढईत तेल  किंवा लोणी गरम करायला ठेवा व त्यात जिरे टाकून जरा परता . 
 • बारीक चिरलेला कांदा टाकून हलका तांबडा होऊ द्या . 
 • आलेलसूण पेस्ट घालून जरा परता . 
 • नंतर बारीक चिरलेला टोमॅटो आणि शिमला मिरची घाला. 
 • चांगले मिक्स करून त्यात हळद, लाल तिखट, पाव भाजी मसाला टाका. 
 • पुन्हा चांगले मिक्स करून मिश्रणाला थोड्या वेळ शिजू द्या . 
 • चिरलेला बटाटा, गाजर आणि मटार टाका व आव्शक्तेनुसार मीठ टाकून शिजवा . 
 • आता मिश्रणात तांदूळ टाकून हलक्या हाताने सर्व भाज्या भातात मिक्स करा . 
 • तवा पुलाव तयार आहे . आवशकता वाटत असेल तर लिंबाचा रस शिंपडून कोथिंबीर सजावटी सह परता . 
 • तवा पुलाव कांदा टोमॅटो च्या रायत्या किंवा काकडी रायत्या किंवा पापडात आणि लोणचे सह किंवा साध्या दह्यासोबत तुम्ही खाऊ शकता . 


Popular Posts

हॅप्पी भाग जएजी हिंदी फिल्म