साहित्य :
कृती -
- ताजे दही - 500 ग्राम .
- साखर - 100 ग्रॅम .(बारीक केलेली )
- केसर - 10-15 तुकडे
- दूध - 1 टेबल चमचा .
- वेलची - 3-4 ( सोलून बारीक केलेली )
- पिस्ता - 4-5 (चिरलेला)
- बदाम - 4 (चिरलेला)
कृती -
- एका रेशीम किंवा मलमल च्या कापडात ताजे दही घट्ट बांधून २ तासापर्यंत ते लटकून ठेवा . नंतर हाताच्या मदतीने सर्व पाणी पिळून घ्या .
- आता एका वाटीत थोडे दुध घेऊन त्यात केसर घाला आणि बाजूला ठेवा .
- तयार झालेले घट्ट दही आता एका भांड्यात घेऊन त्यात कुटलेली वेलाईची आणि साखर घालून मिक्स करा .
- तयार झालेल्या मिश्रणात केसरचे दुध टाका आणि चांगले मिक्स करून त्यात थोडा चिरलेला पिस्ता आणि बदाम टाका व उर्वरिक शेवटी सजवायला ठेवा .
- आता तुमचे श्रीखंड तयार आहे , तयार झालेल्या श्रीखंडाला एखाद्या वाटीमध्ये घेऊन उर्वरित बदाम आणि पिस्त्यानी सजवा व फ्रीज मध्ये जवळ जवळ दोन तासापर्यंत गोठायला ठेवा .
- दोन तासानंतर त्याला फ्रीज मधून काढून सर्व्ह करा .