रेसिपी शोधा

चपाती - Chapati

1 कप गव्हाचे पीठ ( gehun KA आटा )
1 टीस्पून तेल
1/2 टिस्पून मीठ

कृती -
चापातीसाठी गव्हाचे पीठ घेऊन त्यात  तेल आणि मीठ घालून मिक्स करावे आणि थोडे थोडे पाणी घालून एकजीव (मऊ ) होईपर्यंत मळून घ्या. तयार झालेला कणकेचा गोळा ५ ते १० मिनिटे मुरण्यासाठी ठेवा . नंतर त्याचा छोटासा गोळा घेऊन हाताच्या पंजाच्या मदतीने व्यवस्तीत गोल आकार घ्या .
आणि बोटांच्या मदतीने जरा चपटा  करा. गॅस शेगडी चालू करून तवा गरम करायला ठेवा .
तवा गरम होत असतानाच पोळपाटावर थोडे कोरडेपीठ टाकून गोळ्याला लाटण्याच्या मदतीने गोल आकार द्या .
जेव्हा तवा पुरेसा गरम येईपर्यंत त्याच्यावर पोळी टाका .
आगोदर पोळीची एक बाजू आर्धी भाजू द्या आणि पोळीला पालटून दुसरी बाजू सुधा आर्धी भाजू द्या . जेणेकरून पोळीवर तांबडे डाग येतील याची दक्षता घ्या .
नंतर तवा खाली उतरून पुन्हा पहिल्या बाजूवर पोळी सरळ थेट आगेवर धरा . जेणेकरून पोळी फुगायला लागेल .
पुन्हा पोळी पालटून घ्या आणि दुसरी बाजू सुधा फुगायला ठेवा . पोळी जळू नये याची दक्षता घ्या . किवा खूप जास्ती शेकू सुधा नका ज्यामुळे पोळी मऊ होणार नाही .
आता पोळी बाजूला काढून त्यावर लोणी घाला . आणि गरम गरम वाढा

Popular Posts

हॅप्पी भाग जएजी हिंदी फिल्म