रेसिपी शोधा

गाजर हलवा - Gajar Halva

गाजर हलवा - Gajar Halva

साहित्य :
  • गाजर - १ किलो 
  • साखर - २०० ते ३०० ग्राम 
  • दूध - १०० मिली 
  • वेलची - ५ ( कुटून बारीक पावडर केलेली )
  • तूप - १ मोठा चमचा 
  • काजू - २० ग्राम ( तुकडे केलेले )
  • मनुका - २० ग्राम 
कृती :
  • सर्वप्रथम गाजरांना छिलून चांगले धुन घ्या . व बारीक कीस करा . 
  • एका कढईत तूप टाका तूप गरम झाले कि त्यात किसलेले गाजर व दुध टाका . व मंद आचेवर शिजू द्या . मधून मधून हलवीत रहा . 
  • गाजर पुर्णतः नरम होईपर्यंत शिजवा , गाजरांचा रंग हलका गर्द झाला कि त्यात वेलची , काजू आणि मनुका टाका व आणखी २ ते ३ मिनिटांकरिता हलवीत शिजू द्या . 
  • तुमचा गाजरचा हलवा तयार आहे . 

तिळाचे लाडु - Tilache Ladoo

तिळाचे लाडु - Tilache Ladoo

साहित्य :
  • तीळ - २५० ग्राम 
  • शेंगदाणे - २०० ग्राम 
  • गुळ - २५० ग्राम 
कृती :
  • सर्वप्रथम तीळ एका कढईत थोडी तपकिरी होईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्या . व बाजूला काढून ठेवा . आता त्याच कढईत शेंगदाणे भाजायला घ्या थोडे गर्द रंग झाला कि ग्यास बंद करा व थंड होऊ द्या . 
  • दरम्यान तीळ एखाद्या खलात थोडी कुटून घ्या व बाजूला काढून ठेवा . शेंगदाणे थंड झाले कि त्यांचे साल कडून शेंगदाणे वेगळे करा . व तेही खलात थोडे मध्यम कुटून घ्या . व बाजूला काढून ठेवा . 
  • आता गुळ सुद्धा खालामध्ये बारीक करा . 
  • एका भांड्यामध्ये सर्व मिश्रण म्हणजे तीळ , शेंगदाणे व गुळ टाकून चांगले मिक्स करा . आता त्या मिश्रणाचा थोडासा भाग हातात घेऊन लाडू बनवायला घ्या . 
  • तुमचे तिळाचे लाडू तयार आहेत , सर्व साहित्य खालत बारीक केल्यामुळे लाडवांना एक वेगळीच चव येते .  

आवळा मुरब्बा - Awla Murabba

आवळा मुरब्बा  - Awla Murabba

साहित्य :
  • आवळा - १ किलो 
  • साखर - १,१/२ दीड किलो 
  • मिरे - १ छोटा चमचा (कुटून बारीक केलेले)
  • केसर - काही धागे 
  • मीठ - चवीपुरते 
कृती :
  • सर्वप्रथम आवळयांना पाण्याने चांगले धून घ्या . आता एखाद्या काटेरी चमच्याच्या मदतीने त्यांना छिद्र पाडा व  एका भांड्यात आवळे पूर्ण डूबेल आसे पाणी टाकून जवळ जवळ २ - ३ दिवसांकरिता झाकून ठेवा . आता आवळे बाहेर काढून चांगले धून घ्या . 
  • एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवा , पाणी उकळल्यानंतर त्यात आवळे टाका व आणखी काही वेळ उकळू द्या . 
  • आत्ता उकळलेले आवळे पाण्याच्या बाहेर काढून एका भांड्यात घ्या. त्यात साखर टाका व ५ तासांकरिता बाजूला ठेवा जेणेकरून साखर वीरघडून जाईल . आता तेच पातेल आवळ्यासहित पाक बनवायला ठेवा . जेव्हा चांगले सिजून तयार होईल व पाक चांगला गाढा होईल तोपर्यंत सिजु द्या . 
  • तुमचा आवळा मुरब्बा तयार आहे , मुरब्बा थंड करा व त्यात मिरे , केसर, आणि मीठ टाकून चांगले मिक्स करा . 

टॉमेटो सूप - Tomato Soup

टॉमेटो सूप - Tomato Soup


साहित्य :
  • टॉमेटो - १/२ किलो (धून काप केलेले )
  • आले - एक तुकडा ( चीललेका )
  • वाटाणा - अर्धा कप 
  • गाजर - अर्धा कप ( बारीक कीस केलेला )
  • मिरे- १/२ टीस्पून 
  • तूप - १ टेबल चमचा 
  • मक्याचे पीठ - १ टेबल चमचा 
  • मीठ - स्वादानुसार 
कृती :
  • टॉमेटो आणि आल्याला मिक्सी मध्ये चांगले बारीक करून घ्या . व एका भांड्यात टाकून १० मिनिटे उकळायला ठेवा . नंतर चाळनीच्या मदतीने मिश्रणाला चाळून घ्या . 
  • .थोड्याश्या पाण्यामध्ये मक्याचे पीठ घोळून गाठी काढून घ्या .
  • एका काढईत तूप गरम करायला ठेवा , तूप  गरम झाले कि त्यात गाजर व वाटाणा चांगला परतून घ्या . नंतर त्यात मक्याच्या पीठाचे पाणी , टॉमेटो , मिरे आणि आव्श्क्तेनुसार मीठ टाका . व आव्श्क्तेनुसार पाणी घालून उकळी येईपर्यंत शिजवा . 
  • तुमचे टॉमेटो सूप तयार आहे . टॉमेटो सूप वर थोडी क्रीम टाकून सर्व केलास तर टॉमेटो सूप आणखी टेस्टी लागतो . 

तवा नान - Twa Naan

तवा नान - Twa Naan

साहित्य :

  • मैदा - ३००ग्राम 
  • बेकिंग सोडा - अर्धा चमचा 
  • तेल - १ चमचा 
  • दही - १/४ कप 
  • साखर - १ छोटा चमचा 
  • मीठ - स्वादानुसार 
कृती :
  • सर्वप्रथम एका भांड्यात मैदा , साखर व बेकिंग सोडा घ्या . आता त्यात दही टाकून चांगले मिक्स करून घ्या . नंतर थोडे थोडे हलके गरम पाणी टाकीत मैद्याला चांगले मळा . आता थोड्या तेलाच्या मदतीने मैदा चांगला गुळगुळीत होईपर्यंत मळा . व जवळ जवळ ३ तासांकरिता बाजूला ठेवा जेणेकरून मैद्याचा गोळा फुलून नान तयार करायला तयार होईल . 
  • आता तयार गोळ्याचे हव्या त्या आकाराचे गोळे तोडून घ्या . व तवा गरम करायला ठेवा . 
  • आता एक गोळा घ्या व हलका मैद्यात घोळून लाटायला घ्या . तयार पोळीवर थोडे पाणी लावा व तोच वोला भाग तव्यावर जाईल आश्या रीतीने नान तव्यावर टाका . 
  • नान चा रंग थोडा गर्द झालाकी तवा ग्यासवर उलटा पकडा व इकडेतिकडे हलवीत नानला थोडे तपकिरी डाग येईपर्यंत शेका . व नंतर तवा पुन्हा सरळ करून सराट्याच्यामदतीने नानला काढा व थोडेसे तूप लाऊन प्लेटमध्ये जमा करा . व गरम गरम सर्व करा . 

मिल्क मैसूरपाक - milk maisoor pak

मिल्क मैसूरपाक - milk maisoor pak

साहित्य :
  • बेसन - १ कप 
  • साखर- २ कप 
  • तूप - २ कप 
  • दुध - अर्धा कप 
  • वेलची - ३ ते ४ ( कुटून पावडर केलेली )
कृती :
  • सर्वप्रथम एका कढईत बेसन हलका तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या व शेवटी एक चमचा तूप टाकून आणखी थोड्यावेळ भाजा व बाजूला काढून ठेवा . 
  • आता त्याच काढईत दुध आणि साखर टाका व साखरेला वितळू द्या . घट्ट मिश्रण होईपर्यंत मिश्रणाला निरंतर ढवळीत.  आता एखाद्या चमच्याने मिश्रणाचा एका थेंब एखाद्या प्लेटवर टाकून बघा थेंब घट्ट होत असेल तर तुमचे मिश्रण तयार आहे . 
  • आता त्यात बेसन टाका व चांगले ढवळीत सर्व गाठी काढून घ्या . 
  • आता ग्यास मंद करून त्यात आर्धा कप तूप टाका व निरंतर ढवळीत रहा हळू हळू मिश्रण घट्ट होते . आणि सर्व तूप मिश्रण शोषून घेते. 
  • आता उरलेले तूप थोडे थोडे टाकीत मिश्रण ढवळीत रहा. शेवटी मिश्रण घट्ट सोनेरी रंगाचे तयार होते . 
  • आता त्यात वेलची पावडर टाकून मिक्स करून घ्या . 
  • दरम्यान एका प्लेटला थोडे तुप लाऊन तयार ठेवा . 
  • मिश्रण चांगले घट्ट होईपर्यंत हलवीत रहा शेवटी तयार मिश्रणाला प्लेटमध्ये टाका व थोडे थंड होऊ ध्या . व चाकूच्या मदतीने हव्या तेवढ्या आकाराचे काप करून घ्या . 
  • तुमचा मिल्क मैसूर पाक तयार आहे . 

भोपळयाचा हलवा - bhoplyacha halwa

भोपळयाचा हलवा - bhoplyacha halwa


साहित्य :
  • भोपळा - १ किलो 
  • साखर - २५० ग्राम ( किंवा आव्श्क्तेनुसार )
  • दुध - २५० ml
  • खोवा - २०० ग्राम 
  • तूप - ५० ग्राम 
  • वेलची - ६ ते ७ ( कुटून बारीक पावडर केलेली )
  • मनुका - २५ ग्राम 
  • काजू - २५ ग्राम 
कृती :
  • सर्वप्रथम भोपळ्याला आतील भाग सोडून बारीक किसून घ्या . 
  • आता एका कढईत तूप टाकून जरा गरम होऊ द्या. तूप गरम झाले कि त्यात भोपळा, साखर आणि दुध टाका . व निरंतात ढवळीत सिजु द्या जेणेकरून भोपळ्यातील सर्व दुध जवळ जवळ आटून जाईल. 
  • आता त्यात खोवा , काजू आणि मनुका टाका व चांगले ढवळीत ५ ते ६ मिनिटांकरिता शिजू ध्या . 
  • नंतर त्यात वेलची पावडर टाकून चांगले मिक्स करा . 
  • तुमचा भोपळयाचा हलवा तयार आहे . ग्यास बंद करा व थंड झाला कि सर्व करा . 

Popular Posts

हॅप्पी भाग जएजी हिंदी फिल्म