रेसिपी शोधा

उकडीचे मोदक - ukadiche modak


उकडीचे मोदक - ukadiche modak

साहित्य :
पोळी बनविण्याकरिता
  • 1 कप तांदळाचे पीठ
  • 1.5 कप पाणी
  • ¼ टिस्पून तेल किंवा तूप
  • मीठ एक चिमूटभर
मोदक भरणा बनविण्याकरिता 
  • 1 कप किसलेलं ओलं खोबरं 
  • ¾ कप चूर्ण किंवा किसलेले गूळ ( किंवा आव्श्क्तेनुसार )
  • 3 ते 4 वेलची ठेचून बारीक पावडर केलेली 
  • जायफळ पावडर
  • दिड टिस्पून खसखस
  • दिड टिस्पून तूप किंवा तेल
  • दिड चमचा तांदूळ पिठ (पर्यायी)
कृती :

  • एका कढइत तूप गरम करून खसखस, जायफळ व वेलीची पावडर टाकून चांगले परतून घ्या . आता त्यात किसलेलं नारळ व गुळ टाका .चांगले मिक्स करून मिश्रण जरा कोरडे होईपर्यंत मंद आचेवर शिजू द्या . व नंतर ग्यास'बंद करा . व थंड करायला बाजूला ठेवा . 
  • आता एका भांड्यात थोडे तेल टाकून गरम करायला ठेवा , तेल गरम झाल कि त्यात पाणी आणि मीठ टाका व एक उकडी येईपर्यंत सिजु द्या . 
  • पाण्याला उकळी आली कि त्यात तांदळाचे पीठ थोडे थोडे पीठ टाकीत ढवळा व ग्यास बंद करा . व थंड करायला बाजूला ठेवा . 
  • थंड झाल्यानंतर तयार मिश्रणाला एका पसरट भांड्यात घेऊन चांगले मळून एक गोळा तयार करा . 
  • आता या गोळ्याचे हव्या त्या आकाराचे लहान लहान गोळे करा . 
  • आता एका भांड्यात पाणी टाकून उकडायला ठेवा . 
  • हाताला थोडे तेल लाऊन बोटांच्या मदतीने गोळ्यांना जरा चापट करा व त्यात आगोदर तयार केलेले गुळाचे मिश्रण भरून गोळ्याला मोदकाचा आकार द्या . तयार मोदक पाणी उकडायला माद्लेल्या भांड्यामध्ये बसेल अश्या पसरत भांड्यामध्ये ठेवा . 
  • आता पाणी उकडायला लागले असल्यास त्यात एखाद पातेले पालथे ठेवा जेणेकरून आपल्या मोदकाचे भांडे अलगत राहील . 
  • आता मोदकाचे पातेले उकडी आलेल्या भांड्यात अलगत ठेवा व १० ते १५ मिनिटे झाकण ठेऊन वाफून घ्या . 
  • हे आपले उकडीचे मोदक तयार आहेत . 

कोथिम्बिरवडी - kothimbir vadi

कोथिम्बिरवडी - kothimbir vadi


साहित्य :
  • बेसन - दिड कप
  • कोथिंबीर - दिड कप ( व्यवस्थित  धून बारीक चिरलेली )
  • तिळ - 1 टेस्पून ( थोडे लाल होईपर्यंत भाजून घेतलेली )
  • तेल - 1 टेस्पून ( व तळायला आव्श्क्तेनुसार )
  • आले - 1 इंच तुकडा ( किसलेले )
  • हिरवी मिरची - 1 ( बारीक चिरलेला )
  • लाल तिखट - ¼ टिस्पून पेक्षा कमी 
  • हळद -  ¼ टिस्पून पेक्षा कमी 
  • मीठ - 1/3 चमचा ( किंवा चविनुसार)
  • गरम मसाला - ¼ टिस्पून  पेक्षा कमी 
  • बेकिंग सोडा - , ¼ टिस्पून
  • गुळ  - चवीनुसार 
  • हिंग - चिमुटभर 
कृती :
  • सर्वप्रथम एका पातेल्यात बेसन घेऊन थोडे थोडे पाणी टाकीत सर्व गाठी विळेल तोपर्यंत मिक्स करून घ्या . 
  • आता त्यात तील , आले , हिरवी मिरची , लाल तिखट , हाळद , मीठ , गरम मसाला , तेल , गुळ व हिंग घालून चांगले ढवळून घ्या . 
  • आता त्यात कोथिंबीर टाकून चांगले मिक्स करून एक जाड मिश्रण तयार करा . 
  • प्रेशर कुकरमध्ये थोडे पाणी उकळायला ठेवा , व एखादा प्याला कुकर मध्ये पालथा ठेवा जेणेकरून मिश्रणाचे भांडे आलगत राहील . आता मिश्रणात बेकिंग सोडा टाकून जरा मिक्स करा.  
  • प्रेशर कुकर मध्ये बसेल अश्या पसरट भांड्याला थोडे तेल लाऊन त्यात मिश्रण टाका, व कुकरमधल्या पाण्याला उकळी आली कि त्यात ते भांडे ठेवा . 
  • आता कुकरचे झाकण सिटी न लावता लाऊन १५ मिनिटांकरिता मिश्र्नाला वाफेवरती शिजायला ठेवा . कुकरमध्ये निरंतर वाफ तयार होत राहायला हवी याची दक्षता घ्या . 
  • १५ मिनिटांनी कुकरचे झाकण उघडून एखादा चाकू त्यात घुपासून पहा कि मिश्रण त्याला चिकटय किंवा नाही.  जर चाकू पूर्ण साफ बाहेर आला कि समजा तुमचे मिश्रण तयार आहे .  अन्यथा पुन्हा वाफेवर शिजायला ठेवा . 
  • थंड मिश्रण थंड झाले कि त्याचे हवे त्या आकाराचे काप करून घ्या . 
  • एका प्यान मध्ये तेल गरम करायला ठेवा, तेल गरम झाले कि प्यान मध्ये बसेल तेवढ्या कोथिम्बिरवड्या दोन्ही बाजूने हलक्या तपकिरी होईपर्यंत टाळून घ्या . 
  • आता तुमच्या कुरकुरीत  कोथिम्बिरवड्या तयार आहेत . तुम्ही गरम गरम सर्व करा . 

खोब्र्याच्या वड्या - coconut barfi

खोब्र्याच्या वड्या - coconut barfi
NEW BOLLYWOOD MOVIE

साहित्य :
  • 1 कोरडे नारळ ( खवलेले )
  • ५ ते ६ सोलून वेलची पूड
  • 300 gm साखर ( पावडर केलेली )
  • 2 ते 3 टिस्पून तूप
  • केशर 1 चिमूटभर , ठेचून किंवा केशर पावडर 2 ते 3 चिमूटभर (ऐच्छिक)
  • 8 ते 10 काजू तुकडे ( पर्यायी)
  • दुध - १ कप 
कृती :
  • सर्वप्रथम एका भांड्यात दुध गरम करून घ्या. 
  • आता त्यात खवलेले नारळ चांगले ढवळून त्याला एका तासाकारिता बाजूला ठेवा. 
  • आता एका भांड्यात तुप टाकून जरा गरम झाल कि त्यात पाणी व साखर टाकून दोन तारी चाचणी तयार करा . 
  • त्यात नारळाचे मिश्रण टाकून चांगले ढवळा, आता एका पसरट भांड्याला थोडे तूप लाऊन तयार मिश्रण टाका व व्यवस्थित पसरून घ्या. 
  • थोड्या केसरच्या वा काजूच्या तुकड्यांनी जरा सजवा व थंड व्हायला बाजूला ठेवा . 
  • थंड झाले कि तयार मिश्रणाचे हव्या त्या आकाराचे काप  करून अलगत वेगळे करा . 
  • आता तुमच्या खोब्र्याच्या वड्या तयार आहेत , तुम्ही यांना एका हवा बंद डब्यात भरून हवे तेव्हा खाऊ शकता . 

कैरीचे पणे - mango panna

साहित्य :
  • २ ते ३ मध्यम आकाराची कच्चे आंबे 
  • 2-3 वेलची , ठेचून किंवा चूर्ण
  • 4-5 काळी मिरी, ठेचून किंवा चूर्ण (ऐच्छिक)
  • 2 टिस्पून काळे मीठ
  • चूर्ण गूळ / साखर - आव्श्क्तेनुसार 
कृती :
  • सर्वप्रथम आंब्यांना चांगले पाण्याने धुऊन घ्या व प्रेशर कुकरमध्ये पुरेसे पाणी घालून शिजायला ठेवा . ३ ते ४ शिट्ट्या झाल्या कि ग्यास बंद करा व थंड होऊ द्या . 
  • आता आंब्याची साल काढून त्यातला रस एका भांड्यात काढा . वेलची पावडर व मीठ टाकून चांगले मिक्स करा . 
  • आता जवळ जवळ चार कप पाणी टाका आणि आव्श्क्तेनुसार साखर वा गुळ टाकून पुन्हा ग्यासवर एक उकळी येईपर्यंत शिजवा . 
  • कैरीचे पणे तयार आहे तुम्ही त्याला थंड करून केव्हाही पिऊ शकता . 



बटाटा वडा, आलू बोन्डा - Batata Wada, Aloo Bonda

बटाटा वडा, आलू बोन्डा  - Batata Wada, Aloo Bonda

साहित्य :
  • बटाटा - 3 ते ४ मध्यम आकाराचे .
  • बेसन - २ कप.
  • धणे पावडर - 1 चमचा .
  • लाल मिरची पावडर - 1/4 चमचा .
  • गरम मसाला - 1/4 चमचा .
  • आमचूर पावडर - 1/4 चमचा .
  • हिरवी मिरची - 4-5 (चिरलेला)
  • कोथिंबीर - 100 ग्रॅम . (चिरलेला)
  • आले - 1 इंच लांब तुकडा . (चिरलेला)
  • रिफाइन्ड तेल - तळन्याकरिता  .
  • मीठ -आवशकतेनुसार .
कृती :
  • सर्वप्रथम बटाटे प्रेशर कुकरमध्ये उकळून घ्या . व थंड झाल्यावर सोलून त्यांना बाजूला ठेवा . 
  • आता एका वाट्यामध्ये बेसन घ्या , त्यात थोडी कोथिंबीर, थोड्या हिरव्या मिरच्या व मीठ टाकून थोडे थोडे पाणी घालीत मिक्स  करा जेणेकरून छान गुळगुळीत व थोडे घट्ट अस मिश्रण तयार होईल . आता तयारझालेले मिश्रण अमित कमी २० मिनिटाकरिता बाजूला ठेवा . 
  • एका पसरट भांड्यामध्ये बटाटे घ्या त्यात धणे पावडर, लाल मिरची पूड, गरम मसाला, आमचूर पावडर, मीठ, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घालून चांगले कूचकरून घ्या. आणि तयार मिश्रणाचे हव्या त्या आकाराचे लहान लहान गोल गोल गोळे तयार करा . 
  • एका कढईत तेल गरम करायला ठेवा, तेल चांगले गरम झाले कि एक एक बटाट्याचा गोळा बेसनाच्या मिश्रणात बुडवून कढईत  टाका व हलका तांबूस रंग होईपर्यंत तळुन घ्या . आता तयार झालेल्या बटाटा वड्यांना बाहेर काढून एका प्लेट मध्ये सजवा . 
  • गरम गरम बटाटे वडे तुम्ही टोमाटो केचप वा हिरवी मिरच्यान सोबत सर्व करू शकता . 


भाजलेली चणे - Roasted Chickpeas

साहित्य:
  • 2 कप काबुली चणे (किंवा काळा चणा )
  • 1 तमालपत्र / तेजपान
  • 1/4 टिस्पून गरम मसाला
फोडणीसाठी :
  • 1 टेस्पून तेल
  • 1 टिस्पून लाल तिखट
  • 1 टीस्पून चाट मसाला
  • 1/4 टिस्पून हळद
  • 1/2 टिस्पून आमचूर पावडर
  • 1/4 टिस्पून मिरपूड पावडर
  • 1 टिस्पून मिठ (किंवा चवीनुसार )
कृती :
  • सर्वात आगोदर चण्याला चांगले धुऊन  घ्या व एका भांड्यात पुरेसे पाणी घेऊन एक रात्र भिजत घाला . नंतर त्यात तेजपान व गरम मसाला घालून प्रेशर कुकर मध्ये दोन शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्या . प्रेशर कुकर थंड झाल्यावर चाण्याना बाहेर काढून एका पसरट भांड्यामध्ये एक पातळ थरामध्ये पसरून घ्या, जरा त्यांचा ओलावा सुकू द्या . 
  • आता एका प्यान मध्ये तेल टाका, तेल चांगले गरम जाहले कि त्यात लाल तिखट , मिरपूड पावडर, चाट मसाला, हळद , आमचूर आणि मीठ टाकून चांगले परतून घ्या . 
  • आता सुकलेली चणे त्या मिश्रणात टाका आणि चांगले मिक्स करून ग्यास बंद करून त्यांना अर्धा तास मुरु द्या . 
  • आता पुन्हा त्याच प्यान ला ग्यास वर ठेऊन मध्यम आचेवर त्यांना चांगले हलके तांबडे होईपर्यंत भाजा . चणे भाजर असतांना त्यांना मधून मधून हलवीत चला जेणेकरून सर्व चणे व्यवस्थित भाजल्या जाईल . 
  • गरमागरम कुरकुरीत चणे तयार आहे , हि तुम्ही एका हवाबंद डब्यात साठून केव्हाही खाऊ शकता . 

तवा पुलाव - Tawa Pulao

भात बनविण्याकरिता :
  • 1 कप बासमती तांदूळ
  • 4 - 5 कप पाणी
  • तेल - आव्शक्तेनुसर 
  • मीठ - आव्शक्तेनुसर
मसाला बनविण्याकरिता :
  • 1 मध्यम आकाराची चिरलेली शिमला मिरची 
  • 2 मोठे टोमॅटो - 150 ग्रॅम, चिरलेले 
  • 1 मध्यम आकाराचा कांदा - 50 ग्रॅम , चिरलेले 
  • 1 टिस्पून आलेलसूण ची पेस्ट
  • ¼ टिस्पून लाल तिखट
  • ¼ चमचा हळद
  • 2 टिस्पून पाव भाजी मसाला
  • दिड टिस्पून जिरे
  • 2 टेस्पून तेल किंवा बटर किंवा दोन्ही अर्धा - अर्धा
  • १ लहान मध्यम आकाराचे गाजर चिरलेले 
  • 1 मध्यम आकाराचा चिरलेला बटाटा,
  • दिड कप हिरवे मटार
  • दिड टिस्पून लिंबाचा रस
  • कोथिंबीर - चिरलेली 
  • मीठ - आव्श्क्तेनुसार 
कृती -

भात बनविण्याकरिता :

  • सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ पाण्यानी धून घ्या जेणेकरू त्यातला सर्व स्टार्च निघून जाईल . 
  • एका भांड्यामध्ये पुरेसे पाणी घेऊन त्यात तांदूळ २० ते ३० मिनिटे भिजत ठेवा व नंतर काढून एखाद्या दुसरया भांड्यामध्ये काढून बाजूला ठेवा . 
  • आता तांदुळात पाणी टाकून आव्शक्तेनुसर मीठ आणि तेलाची काही थेंब टाका . व चांगल्या पद्धतीने सिजवा जेणेकरून तांदळाचा प्रत्येक कण वेगळा आणि शिजलेला असेल . 
  • आता गाळण्याच्या मदतीने शिजवलेल्या भातातील सर्व पाणी काढून घ्या . 
  • एका भांड्यात भात पसरून सर्व स्टीम (वाफ) बाहेर निघाल्या वर एका भांड्याने झाकून ठेवा . 
मसाला बनविण्याकरिता :


  • एका प्रेशर कुकर मध्ये गाजर, बटाटा आणि मटार शिजवून घ्या . व बटाट्याला सोलून बटाटा आणि गाजराला चिरून बाजूला ठेवा . 
  • आता एका कढईत तेल  किंवा लोणी गरम करायला ठेवा व त्यात जिरे टाकून जरा परता . 
  • बारीक चिरलेला कांदा टाकून हलका तांबडा होऊ द्या . 
  • आलेलसूण पेस्ट घालून जरा परता . 
  • नंतर बारीक चिरलेला टोमॅटो आणि शिमला मिरची घाला. 
  • चांगले मिक्स करून त्यात हळद, लाल तिखट, पाव भाजी मसाला टाका. 
  • पुन्हा चांगले मिक्स करून मिश्रणाला थोड्या वेळ शिजू द्या . 
  • चिरलेला बटाटा, गाजर आणि मटार टाका व आव्शक्तेनुसार मीठ टाकून शिजवा . 
  • आता मिश्रणात तांदूळ टाकून हलक्या हाताने सर्व भाज्या भातात मिक्स करा . 
  • तवा पुलाव तयार आहे . आवशकता वाटत असेल तर लिंबाचा रस शिंपडून कोथिंबीर सजावटी सह परता . 
  • तवा पुलाव कांदा टोमॅटो च्या रायत्या किंवा काकडी रायत्या किंवा पापडात आणि लोणचे सह किंवा साध्या दह्यासोबत तुम्ही खाऊ शकता . 


Popular Posts

हॅप्पी भाग जएजी हिंदी फिल्म