रेसिपी शोधा

भाजलेली चणे - Roasted Chickpeas

साहित्य:
  • 2 कप काबुली चणे (किंवा काळा चणा )
  • 1 तमालपत्र / तेजपान
  • 1/4 टिस्पून गरम मसाला
फोडणीसाठी :
  • 1 टेस्पून तेल
  • 1 टिस्पून लाल तिखट
  • 1 टीस्पून चाट मसाला
  • 1/4 टिस्पून हळद
  • 1/2 टिस्पून आमचूर पावडर
  • 1/4 टिस्पून मिरपूड पावडर
  • 1 टिस्पून मिठ (किंवा चवीनुसार )
कृती :
  • सर्वात आगोदर चण्याला चांगले धुऊन  घ्या व एका भांड्यात पुरेसे पाणी घेऊन एक रात्र भिजत घाला . नंतर त्यात तेजपान व गरम मसाला घालून प्रेशर कुकर मध्ये दोन शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्या . प्रेशर कुकर थंड झाल्यावर चाण्याना बाहेर काढून एका पसरट भांड्यामध्ये एक पातळ थरामध्ये पसरून घ्या, जरा त्यांचा ओलावा सुकू द्या . 
  • आता एका प्यान मध्ये तेल टाका, तेल चांगले गरम जाहले कि त्यात लाल तिखट , मिरपूड पावडर, चाट मसाला, हळद , आमचूर आणि मीठ टाकून चांगले परतून घ्या . 
  • आता सुकलेली चणे त्या मिश्रणात टाका आणि चांगले मिक्स करून ग्यास बंद करून त्यांना अर्धा तास मुरु द्या . 
  • आता पुन्हा त्याच प्यान ला ग्यास वर ठेऊन मध्यम आचेवर त्यांना चांगले हलके तांबडे होईपर्यंत भाजा . चणे भाजर असतांना त्यांना मधून मधून हलवीत चला जेणेकरून सर्व चणे व्यवस्थित भाजल्या जाईल . 
  • गरमागरम कुरकुरीत चणे तयार आहे , हि तुम्ही एका हवाबंद डब्यात साठून केव्हाही खाऊ शकता . 

Popular Posts

हॅप्पी भाग जएजी हिंदी फिल्म