साहित्य :
- २ ते ३ मध्यम आकाराची कच्चे आंबे
- 2-3 वेलची , ठेचून किंवा चूर्ण
- 4-5 काळी मिरी, ठेचून किंवा चूर्ण (ऐच्छिक)
- 2 टिस्पून काळे मीठ
- चूर्ण गूळ / साखर - आव्श्क्तेनुसार
कृती :
- सर्वप्रथम आंब्यांना चांगले पाण्याने धुऊन घ्या व प्रेशर कुकरमध्ये पुरेसे पाणी घालून शिजायला ठेवा . ३ ते ४ शिट्ट्या झाल्या कि ग्यास बंद करा व थंड होऊ द्या .
- आता आंब्याची साल काढून त्यातला रस एका भांड्यात काढा . वेलची पावडर व मीठ टाकून चांगले मिक्स करा .
- आता जवळ जवळ चार कप पाणी टाका आणि आव्श्क्तेनुसार साखर वा गुळ टाकून पुन्हा ग्यासवर एक उकळी येईपर्यंत शिजवा .
- कैरीचे पणे तयार आहे तुम्ही त्याला थंड करून केव्हाही पिऊ शकता .