साहित्य :
- बेसन - दिड कप
- कोथिंबीर - दिड कप ( व्यवस्थित धून बारीक चिरलेली )
- तिळ - 1 टेस्पून ( थोडे लाल होईपर्यंत भाजून घेतलेली )
- तेल - 1 टेस्पून ( व तळायला आव्श्क्तेनुसार )
- आले - 1 इंच तुकडा ( किसलेले )
- हिरवी मिरची - 1 ( बारीक चिरलेला )
- लाल तिखट - ¼ टिस्पून पेक्षा कमी
- हळद - ¼ टिस्पून पेक्षा कमी
- मीठ - 1/3 चमचा ( किंवा चविनुसार)
- गरम मसाला - ¼ टिस्पून पेक्षा कमी
- बेकिंग सोडा - , ¼ टिस्पून
- गुळ - चवीनुसार
- हिंग - चिमुटभर
कृती :
- सर्वप्रथम एका पातेल्यात बेसन घेऊन थोडे थोडे पाणी टाकीत सर्व गाठी विळेल तोपर्यंत मिक्स करून घ्या .
- आता त्यात तील , आले , हिरवी मिरची , लाल तिखट , हाळद , मीठ , गरम मसाला , तेल , गुळ व हिंग घालून चांगले ढवळून घ्या .
- आता त्यात कोथिंबीर टाकून चांगले मिक्स करून एक जाड मिश्रण तयार करा .
- प्रेशर कुकरमध्ये थोडे पाणी उकळायला ठेवा , व एखादा प्याला कुकर मध्ये पालथा ठेवा जेणेकरून मिश्रणाचे भांडे आलगत राहील . आता मिश्रणात बेकिंग सोडा टाकून जरा मिक्स करा.
- प्रेशर कुकर मध्ये बसेल अश्या पसरट भांड्याला थोडे तेल लाऊन त्यात मिश्रण टाका, व कुकरमधल्या पाण्याला उकळी आली कि त्यात ते भांडे ठेवा .
- आता कुकरचे झाकण सिटी न लावता लाऊन १५ मिनिटांकरिता मिश्र्नाला वाफेवरती शिजायला ठेवा . कुकरमध्ये निरंतर वाफ तयार होत राहायला हवी याची दक्षता घ्या .
- १५ मिनिटांनी कुकरचे झाकण उघडून एखादा चाकू त्यात घुपासून पहा कि मिश्रण त्याला चिकटय किंवा नाही. जर चाकू पूर्ण साफ बाहेर आला कि समजा तुमचे मिश्रण तयार आहे . अन्यथा पुन्हा वाफेवर शिजायला ठेवा .
- थंड मिश्रण थंड झाले कि त्याचे हवे त्या आकाराचे काप करून घ्या .
- एका प्यान मध्ये तेल गरम करायला ठेवा, तेल गरम झाले कि प्यान मध्ये बसेल तेवढ्या कोथिम्बिरवड्या दोन्ही बाजूने हलक्या तपकिरी होईपर्यंत टाळून घ्या .
- आता तुमच्या कुरकुरीत कोथिम्बिरवड्या तयार आहेत . तुम्ही गरम गरम सर्व करा .