रेसिपी शोधा

बेसन शेव - Besan Sev


साहित्य :
  • तळण्यासाठी 3 कप तेल
  • 2 टेस्पून पाणी
  • 12 टेस्पून बेसन
  • 4 टेस्पून तांदूळ पिठ
  • 1 टेस्पून हळद
  • 1 टेस्पून लाल तिखट
  • 1 टेस्पून जिरे
  • 1 टेस्पून ओवा पावडर
  • दिड टेस्पून बेकिंग सोडा
  • चविनुसार मीठ

कृती -
  • सर्वप्रथम बेसन आणि तांदूळाच्या पिठाला चाळून घ्या . नंतर त्यात मीठ, लाल तिखट, जिरे, ओवा पावडर , हळद आणि बेकिंग सोडा टाका सर्व छान मिक्स करा . 
  • आता थोडे पाणी घालून मिश्रणाला चांगले मळून घ्या . तयार झालेला कणकीचा गोळा मऊ आणि गुळगुळीत असायला हवा . मिश्रणात जास्ती पाणी टाकल्या जाणार नाही याची काळजी घ्या . 
  • आता तयार झालेल्या गोळ्याला एका ओलसर कापडाने गुंडाळून १५ मिनिटांकरिता बाजूला ठेवा . 
  • चकली मेकरला थोडे तेल लाऊन शेव बनविण्याचा साचा जोडा . नंतर तयार झालेल्या कणकीच्या गोळ्याचा थोडा तुकडा तोडून त्यात टाका . तसेच एक पॅन किंवा कढई घेऊन त्यात तेल टाकून मध्यम आचेवर गरम करायला ठेवा . 
  • तेल खूप जास्ती गरम होणार नाही याची काळजी घ्या . आता चकली मेकरला पॅनवर धरून हाताचा दाब वाढवीत गोलाकार आकारामध्ये फिरवा . 
  • शेव चांगले कुरकुरीत हलके लाल होईपर्यंत दोन्ही बाजूने तळा व काढून एका प्लेट मध्ये ठेवा . 
  • थंड झाल्यावर एका हवाबंद डब्यात त्यांना भरून तुम्ही एका आठवडयापर्यंत खाऊ शकता . 

मुरमुरा लाडू - Murmura Ladoo

साहित्य -
  • 250 ग्रॅम मुरमुरे
  • 750 ग्रॅम गूळ
  • 3 व 1/2 कप पाणी
कृती - 
  • सर्व प्रथम मुर्मुर्याला एका कढईत जरा परतून घ्या . जेणेकरून मुर्मुर्याना थोडा कडक पण येईल 
  • आता कढईत गूळ आणि पाणी टाका व गुळ चांगला विरघळेपर्यंत कमी आचेवर शिजवा व नंतर जरा ग्यास वाढून दोन तारी सुसंगतता येईल इतके उकळा. 
  • दोन तारी सुसंगतता येताच त्यात त्वरीत मुरमुरे मिक्स करा . व गॅस बंद करा . 
  • मिश्रण थोडे थंड झाल्यावर हाताला पाणी लाऊन त्याचे लहान लहान लाडू करा . 
  • थोडे थंड होऊ द्या व नंतर सर्व करा . 

श्रीखंड - shrikhand

साहित्य :

  • ताजे दही - 500 ग्राम .
  • साखर - 100 ग्रॅम .(बारीक केलेली )
  • केसर  - 10-15 तुकडे 
  • दूध - 1 टेबल चमचा .
  • वेलची - 3-4 ( सोलून बारीक केलेली )
  • पिस्ता - 4-5 (चिरलेला)
  • बदाम - 4 (चिरलेला)

कृती -

  • एका रेशीम किंवा मलमल च्या कापडात ताजे दही घट्ट बांधून २ तासापर्यंत ते लटकून ठेवा . नंतर हाताच्या मदतीने सर्व पाणी पिळून घ्या . 
  • आता एका वाटीत थोडे दुध घेऊन त्यात केसर घाला आणि बाजूला ठेवा . 
  • तयार झालेले घट्ट दही आता एका भांड्यात घेऊन त्यात कुटलेली वेलाईची आणि साखर घालून मिक्स करा . 
  • तयार झालेल्या मिश्रणात केसरचे दुध टाका आणि चांगले मिक्स करून त्यात थोडा चिरलेला पिस्ता आणि बदाम टाका व उर्वरिक शेवटी सजवायला ठेवा . 
  • आता तुमचे श्रीखंड तयार आहे , तयार झालेल्या श्रीखंडाला एखाद्या वाटीमध्ये घेऊन उर्वरित बदाम आणि पिस्त्यानी सजवा व फ्रीज मध्ये जवळ जवळ दोन तासापर्यंत गोठायला ठेवा . 
  • दोन तासानंतर त्याला फ्रीज मधून काढून सर्व्ह करा . 

पाव भाजी - Pav Bahji

पाव भाजी - Pav Bahji

भाजी करण्यासाठी:

साहित्य :
  • बटाटा - 200 ग्रॅम चिरलेला 
  • गाजर - 100 ग्रॅम चिरलेला 
  • फुलकोबी - 100 ग्रॅम चिरलेला 
  • मटार 100 ग्रॅम किंवा 1 कप
  • तेल किंवा तूप  2 टे स्पून 
  • जिरे - 1/2 चमचा
  • हळद - 1/2 चमचा
  • मिरची पावडर - 1/2 चमचा
  • पाव भाजी मसाला - 2 चमचा
  • टोमॅटो - 2 बारीक चिरून
  • मिरची - 2 बारीक चिरून
  • आले - 1 तुकडा ( बारीक चिरलेला ) किंवा 2 चमचा पेस्ट
  • 4 - 3 - हिरव्या मिरच्या ( बारीक चिरून )
  • कोथिंबीर - 100 ग्रॅम ( बारीक चिरून )
  • लिंबू - 1
  • मीठ ( आवडीनुसार ) 
  • लोणी (आवश्यकतेनुसार )
कृती -
  • सर्वप्रथम सर्व भाज्या (बटाटे, गाजर , फुलकोबी इत्त्यादी ) एक कप पाणी आणि अर्धा चमचा मीठ टाकून चांगल्या उकळून घ्या . आता एका चमच्याच्या मदतीने सर्व भाज्या चांगल्या मॅश करा व बाजूला ठेवा . 
  • एका पॅन मध्ये तेल किंवा तूप गरम करायला ठेवा , गरम झालेल्या तेलात जिरे टाका . आता त्यात बारीक चिरलेला कांदा टाका व हलका तांबडा रंग येईपर्यंत परतून घ्या . 
  • नंतर त्यात हळद, टोमॅटो, मिरची पावडर आणि हिरव्या मिरच्या टाका व २ ते ३ मिनिटे सिजु द्या . आता त्यात आलं आणि पाव भाजी मसाला टाका आणि चांगले परतून घ्य. 
  • आता त्यात मॅश केलेल्या भाज्या टाका , आवस्क्तेनुसार मीठ आणि पाणी टाकून उकळी येऊ द्या . 
  • तुमची पावभाजी आता तयार आहे , आता तुम्ही ग्यास बंद करू शकता. 
  • आता एका वाटीत पावभाजी घेऊन तिला कोथिंबीर आणि लोण्याने सजवा . 

पाव बनवण्यासाठी :

साहित्य':
  • पाव - १०
  • लोणी (आवश्यकतेनुसार)
कृती -
  • पावांना मध्यभागातून एक भाग सोडून काप करा . 
  • एका गरम पॅन वर,थोडे लोणी वितळायला ठेवा . 
  • त्या पॅन वर २ ते ३ पाव ठेऊन त्यांची दोन्ही बाजू भाजून घ्या . आता थोडे लोणी पावांच्या आतल्या बाजूस लाऊन हलके तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या . आता आपले पाव तयार आहे. 
  • गरम गरम भाजी सोबत दोन पाव आणि एक कापलेल्या लिंबसोबत सर्व्ह करा. 

धपाटे - Dhapate

1 कप ज्वारीचे पीठ
1/2 कप गव्हाचे पीठ
१/२ कप  ह. डाळीचे पीठ   
1-2 टिस्पून. हिरवी मिरची,
6-7 लसूण पाकळ्या
1/4 कप चिरलेली कोथिंबीर
1/4 टिस्पून . हळद
1/4 टिस्पून . जिरे.
मीठ चवीनुसार
तेल आवश्यकत्तेनुसार 

कृती - 
  •  हिरवी मिरची आणि लसूण पेस्ट बनवा .
  • एक ताटात ज्वारीचे पीठ, गव्हाचे पीठ,  ह. डाळीचे पीठ घ्या  त्यात 
  • मिरची आणि लसूण पेस्ट, हळद, जिरे , गरम मसाला, कोथिंबीर आणि मीठ घाला
  • नंतर सर्व एकत्र करून त्यात थोड़े थोड़े पानी घालून हाताने चांगले मळुन  घ्या 
  • मळलेल्या पीठाचे लहान लहान गोळे करून घ्या . 
  • प्लास्टिक चा कागद किंवा सुती जाड कपडा घेऊन त्याला थोडे पाणी लाऊन त्याचाय्वर तो पिठाचा गोळा ठेऊन बोटांच्या मदतीने थापून गोल आकार द्या, पण त्याच्या कडा तुटल्या जाणार नाही याची दक्षता घ्या . एका बोटाने मध्यभागी लहानशे छिद्रे पाडून घ्या .
  • एका फ्रायपॅन किंवा तवा घेऊन तो गरम झाल्यावर, त्यावर थोडे तेल पसरून घ्या . 
  • नंतर त्या कपड्याचे दोन्ही टोक पकडून ती धपाट तव्यावर अलगत सोडा. हे करत असतांना धपाट तुटणार नाही याची काळजी घ्या . 
  • आता थोडे चमच्याने धपाटयाच्या छिद्रांमध्ये थोडे आणि सभोवताली तेल सोडा . आणि मधम आचेवर धपाट एका बाजूने भाजू द्या, व काही वेळानी पालटून दुसरी बाजू भाजू द्या . 
  •  तयार झालेल्या गरम गरम धपाटयाचा आस्वाद घ्या . 

मिसळ पाव - Misal Pav

3.5 कप, मोड आलेली मटकी
1 मोठा किंवा मध्यम कांदा, बारीक चिरून
1 किंवा 2 हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
3 ते 4 लसूण, 1 इंच आलं -  पेस्ट
1 टिस्पून मोहोरी
२-३ मिर
१ लहान काडी दालचिनी
२-३ लवंगा
१ तमालपत्र1 टीस्पून जिरे (लिंबाचा रस)
10 ते 12 कढीपत्ता पाने
1 ते 1.5 टेस्पून कांदा लसुण मसाला / काला मसाला
१/२ टिस्पून हळद पावडर
दिड टिस्पून लाल तिखट
1 टिस्पून धणे पावड
1 टीस्पून जिरेपूड
1.5 चमचा बी नसलेला चिंच
¾ 1 कप पाणी किंवा आवश्यकतेनुसार
3 टेस्पून तेल
मीठ आवश्यक म्हणून

मिसळ पाव साठी:
8 ते 10 पाव
1 कप बारीक चिरलेला कांदा
1 कप बारीक चिरलेला टोमॅटो (पर्यायी)
1 कप जाड शेव किंवा फरसाण / चिवडा
1 लिंबू
⅓ कप कोथिंबीर

कृती-
  • मटकिला मोड आणण्यासाठी एका भांड्यात कोमट पाणी घेऊन त्यात मटकी  ७-८ तास भिजत ठेवा  नंतर भिजलेल्या मटकीला एका सुती कपडा मध्ये बांधून ठेवा
  • मोड आलेली मटकीला व्यवस्थित धुवून घ्या .
  • आणि एका प्रेशर कुकर मध्ये हळद आणि मीठ टाकून त्यात मटकी टाका . मटकी पूर्णतः पाण्यात बुडेल इतके पाणी टाका . (जर तुम्ही मटकी सोबत इतरही कडधान्य टाकत आसल तर पाणी थोडे जास्ती ठेवा. )
  • आता 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत शिजू द्या . 
  • एका भांड्यात दिड कप गरम पाणी टाका आणि त्यात चिंच 25 ते 30 मिनिटे भिजून घ्या . चिंच पिळून त्याचा कोळ बाजूला ठेवा . 
  • आलं-लसूण ,जिरे,मिर, दालचिनी,  लवंगा,तमालपत्र हे सर्व मिक्समधून बारीक़ करून घ्या  
  • एका  कढईत तेल गरम करायला ठेवा . 
  •  मोहरी टाकून तडकू द्या नंतर मिक्सरमध्ये बारीक़ केलेला मसाला टाका व् चांगला परतुन घ्या 
  • . आता त्यात कांदा घालून हलका तपकिरी होईपर्यंत परतून घ्या . 
  • नंतर, कढीपत्ता,  हिरवी मिरची घालून नीट हलवून घ्या . 
  • उर्वरित ¼ टिस्पून हळद, धणे पूड, जिरे पूड, लाल तिखट आणि गोड मसाला टाका .नीट ढवळून घ्या आणि नंतर चिंचेचा घट्ट कोळ टाका . आणि थोड्या वेळ सिजु द्या . 
  • आता मटकी प्रेशर कुकर मधून काढून तयार झालेल्या मिश्रणात टाका,  त्यात मीठ घाला  . व ¾  ते 1 कप किंवा आवश्यकतेनुसार पाणी घालून नीट ढवळून घ्या . 
  • कमी आचेवर जवळ जवळ 8 ते 10 मिनिटे उसळ  अधूनमधून हलवीत उकळु द्या . व शेवटी कोथिंबीर सह सजवा. 
  • बारीक कांदे आणि टोमॅटो चिरून घेऊन बाजूला ठेवा.
  •  सर्व्ह करताना वाटी मध्ये प्रथम चिरलेला कांदा व टोमॅटो घाला 
  • नंतर  वाफाळलेली  उसळ घ्या. 
  • बारीक चिरलेली कोथिंबीर घाला . व त्यावर लिंबाचा रस काही थेंब पिळा . 
  • नंतर फरसाण किंवा चिवड्या टाका .मिसळचा  आस्वाद घ्या . 

बटाट्याची सुकी चटणी - Batatyachi Suki Chatani

बटाट्याची सुकी चटणी - Batatyachi Suki Chatani


बटाटे - 2 मोठे, उकडून आवश्क्तेनुसार कुस्करून
तेल - २ टे. स्पून
मोहरी - १/२ चमचे
जिरे - १/२ चमचे
हिरव्या मिरच्या - 2 , बारीक चिरलेला
कढीपत्त्याची पाने - 5-6
हळद - ¼ चमचे
आद्रक लसुन ची पेस्ट - १/२ चमचे
हिंग - चिमूटभर
कांदा - १ - २ चिरलेली
मीठ - चवीनुसार
साखर - एक चिमूटभर ( पर्यायी )

कोथिंबीर -  बारीक चिरलेला

कृती -

  • एका  भांड्यात बटाटे उकडून घ्या . व उकडल्यानंतर त्याची साल काढून तो आवश्क्तेनुसार कुस्करून घ्या . 
  • एका कढईत मध्यम आचेवर तेल गरम करून घ्या . त्यात जिरे, मोहरी टाकून तडकू द्या . आद्रक लसुन ची पेस्ट टाका . 
  • नंतर त्यात हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता पाने घालून परतून घ्या . 
  •  लगेच चिरलेला कांदा टाका आणि हलका तपकिरी होईपर्यंत परता . त्यात हळद आणि हिंग घालून त्यात, थोडे मीठ घाला. 
  • नंतर तयार झालेल्या फोडणीत कुस्करलेले बटाटे घाला आणि मिक्स करून घ्या . शेवटी चिरलेली कोथिंबीर घाला व सर्व्ह करा. 

Popular Posts

हॅप्पी भाग जएजी हिंदी फिल्म