साहित्य :
- 1 कोरडे नारळ ( खवलेले )
- ५ ते ६ सोलून वेलची पूड
- 300 gm साखर ( पावडर केलेली )
- १ ते १.५ कप दुध
- 2 ते 3 टिस्पून तूप
- केशर 1 चिमूटभर , ठेचून किंवा केशर पावडर 2 ते 3 चिमूटभर (ऐच्छिक)
- 8 ते 10 काजू तुकडे ( पर्यायी)
- सर्वप्रथम एका भांड्यात दुध गरम करून घ्या.
- आता त्यात खवलेले नारळ चांगले ढवळून त्याला एका तासाकारिता बाजूला ठेवा.
- आता एका भांड्यात तुप टाकून जरा गरम झाल कि त्यात पाणी व साखर टाकून दोन तारी चाचणी तयार करा .
- त्यात नारळाचे मिश्रण टाकून चांगले ढवळा, आता एका पसरट भांड्याला थोडे तूप लाऊन तयार मिश्रण टाका व व्यवस्थित पसरून घ्या.
- थोड्या केसरच्या वा काजूच्या तुकड्यांनी जरा सजवा व थंड व्हायला बाजूला ठेवा .
- थंड झाले कि तयार मिश्रणाचे हव्या त्या आकाराचे हाताच्या मदतीने लाडू बनवायला घ्या . .
- आता तुमचे नारळाचे लाडू तयार आहेत , तुम्ही यांना एका हवा बंद डब्यात भरून हवे तेव्हा खाऊ शकता .