करंजी - karanji recipe
साहित्य :
साहित्य :
- दिड कप बारीक खवलेले नारळ
- 1 टेस्पून पांढरा तिळ
- 8 ते 9 बदाम
- 9 ते 10 काजू
- 9 ते10 सोनेरी मनुका
- 4 हिरव्या वेलच्या, कुटून बारीक पूड केलेला,
- 3 टेस्पून किंवा आवश्यकतेनुसार साखर, चांगली बारीक करून घेतलेली
- एक चिमूटभर जायफळ पावडर
- दिड टेस्पून तूप
कारंजी आवरानाकरिता :
- 2 कप मैदा
- 2 टेस्पून तूप
- ¼ टिस्पून मिठ
- दिड कप ते एक टेस्पून दूध किंवा आवश्यकतेनुसार
कृती :
- सर्वप्रथम नारळ भाजायला एका प्यान मध्ये तूप गरम करायला ठेवा . तूप गरम झाले कि त्यात खवलेले नारळ टाका व हलके तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या . भरलेल्या नारळाला बाजूला काढून ठेवा व त्याच प्यान मध्ये तीळ भाजायला घ्या . तीळ रंग बदलताच त्याना बाजूला काढून घ्या .
- आता मिक्सर ग्राईडर मध्ये बदाम, काजू , बेदाणे थोडे बारीक करून घ्या .
- आता एका भांड्यामध्ये नारळ , तीळ , व बदाम , काजू व बेदाणे मिक्स करून घ्या .
- आता मिश्रणात साखर, जायफळ , आणि विलायची पावडर टाकून चांगले मिक्स करून घ्या . व बाजूला ठेवा .
- बाहेरील आवरण बनविण्याकरिता एका प्यान मध्ये हलके गरम करायला ठेवा .
- एका भांड्यामध्ये मैदा घ्या , त्यात तूप आणि मीठ टाका . व चांगले मिक्स करून घ्या .
- आता त्यात थोडे थोडे दुध टाकत मळीत एक मऊ असा गोळा तयार करा व १५ ते २० मिनिटांकरिता बाजूला ठेवा .
- मोठ्या गोळ्याचा थोडासा तुकडा तोडून पोळी लाटायला घ्या .
- आता दोन ते तीन चमचे नारळाचे मिश्रण पोळीच्या मध्य भागी ठेवा . पोळीचे काठ मोकळे राहील याची दक्षता घ्या .
- बोटांच्या मदतीने थोडे पाणी पोळीच्या काठाला लाऊन घ्या . व हलक्या हाताने दोन्ही काठ जोडा, बोटाच्या मदतीने काठ चांगले दाबीत पोळीला करंजीचा आकार द्या .
- एका काढइत तेल गरम करायला ठेवा . व हलक्या हाताने तयार कारंजी गरम तेलात सोडा . व हलका सोनेरी रंग होईपर्यंत तळून घ्या .
- आता गरमा गरम करंजी तयार आहेत .