साहित्य :
पुरण बनविण्याकरिता
- 1 कप बारीक केलेला गुळ
- 1 कप चणाडाळ/हरभरा डाळ
- 3 कप पाणी
- 2 टिस्पून तूप
- 1 चमचा बडीशेप पावडर
- ¾ ते 1 टीस्पून सुंठ पावडर
- दिड टीस्पून वेलची पावडर किंवा 4-5 वेलच्या बारीक ठेचून
- ¼ टिस्पून जायफळ पावडर
पोळी बनविण्याकरिता
- २ कप गव्हाचे पीठ
- 1 टीस्पून तेल किंवा तूप
- दिड टिस्पून मिठ किंवा आवश्यकतेनुसार
- ¼ चमचा हळद
- पुरण पोळी तळण्यासाठी तेल किंवा तूप आवश्यकतेनुसार
कृती :
- सर्वप्रथम चणाडाळ चांगले पाण्याने धून घ्या . व एका प्रेशर कुकर मध्ये पाणी टाकून ६ ते ७ शिट्ट्या होईपर्यंत सिजून घ्या . कुकर थंड झाला कि पाणी काढून घ्या .
- एका कढईत तूप गरम करायला ठेवा . तूप गरम झाले कि त्यात सुंठ, जायफळ, वेलची पावडर व बडीशेप पावडर टाकून काही सेकंद परतून घ्या .
- आता त्यात चणाडाळ आणि गुळ टाकून चांगले मिक्स करून घ्या व सर्व मिश्रण जरा कोरडे होईपर्यंत मंद आचेवर शिजू द्या.
- मधून मधून मिश्रण हलवीत रहा . मिश्रण जरा कोरडे झाले कि ग्यास बंद करा .
- थंड झाल्यानंतर पुरणाला चांगले बारीक वाटून घेऊन बाजूला ठेवा .
- आता एका भांड्यात गव्हाचे पीठ घेऊन त्यात मिठ टाकून चांगले मिक्स करून घ्या .
- थोडे पाणी आणि तूप टाकून मिक्स करा व थोडे थोडे पाणी टाकीत एक गोळा तयार करा .
- तयार गोळ्याला १५ ते २० मिनिटे बाजूला ठेवा .
- पुरण पोळी लाटायला घ्या , तयार गोळ्यामधून मध्यम आकाराचा तुकडा तोडून कोर्पाटाला थोडे पीठ लाऊन मध्यम आकाराची पोळी लाटा आणि मध्य भागी पुराणाचे मिश्रण टाकून सभोतालच्या कडा जोडून थोड्या आणखी पिठामध्ये घोळून पोळी लाटायला घ्या . व एक मध्यम आकाराची पोळी लाटून घ्या .
- आता तवा जरा गरम करायला ठेवा , तवा गरम झाला कि त्यावर थोडे तूप टाका व पोळी त्यावर टाका .
- एक बाजू हलकी तपकिरी झाली कि पोळीला पलटवा व दुसरी बाजू हलका तपकिरी रंग येयीपर्यंत भाजून घ्या .
- तुमची गरमा गरमा पुरण पोळी तयार आहे , हि तुम्ही दुध , तूप वा दह्यासोबत सर्व करू शकता .