साहित्य :
- ४ कप बेसन ( थोडे जाड दळलेले )
- २ ते ३ कप साखर
- १ किलो तेल वा तूप
- पाणी (आव्शाक्तेनुसार )
- काजू किंवा सुका मेवा (पर्यायी )
- चिमुटभर लाडू रंग (पर्यायी)
कृती :
- सर्वप्रथम बेसन पाण्यात टाकून मध्यम आसे मिश्रण तयार करून घ्या . मिश्रण खूप जास्ती घट्ट किंवा खूप जास्ती पातळ होता कामा नये . तुम्ही या मिश्रणात लाडू रंग सुद्धा टाकू शकता .
- आता एका कढईत तेल गरम करायला ठेवा . तेल गरम आले किंवा नाही हे तपासण्याकरिता थोडे मिश्रणाचे थेंब त्यात टाकून बघावे . थेंब वर येत असतील तर तेल आता बुंदी काढायला तयार आहे.
- बुंदी काढावयाचा झारा किंवा एखादा बारीक चिद् असलेला झारा घ्या व त्याला कढईवर पकडून थोडे मिश्रण टाका व झर्याला वर खाली करीत राहा जेणेकरून बुंदीचे थेंब व्यवस्थित तेलामध्ये पडेल . तेलामध्ये सर्व बुंदी दुबेल एवढेच थेंब त्यात सोडा .
- आता बुन्दीला हलका तपकिरी रंग येईपर्यंत तळून घ्या . व तेलाच्या बाहेर काढून एखाद्या भांड्यात जमा करा .
- आता एका भांड्यात १ ते १. ५ कप पाणी आणि साखर टाकून ग्यासवर पाक बनवायला ठेवा . जवळ जवळ एक तारी पाक तयार करा . व भांडे खाली उतरावा .
- थंड झालेल्या बुन्दिमध्ये काजू किंवा सुका मेवा चांगला मिसळून घ्या . एक दोन चमचे पाक टाकीत लाळू बनवायला घ्या .
- तुमचे मोतीचूर लाडू तयार आहेत .