रेसिपी शोधा

चोकलेट सामोसा - chocolate samosa

चोकलेट सामोसा - chocolate samosa

साहित्य :
  • दीड कप मैदा 
  • २ ते ३ टीस्पून बारीक कुटलेली साखर 
  • २ टीस्पून तूप 
  • १ कप बारीक किसलेले चोकलेट 
  • १ टेबलस्पून पिस्ता (कापून बारीक केलेले )
  • तेल सामोसे तळन्याकरिता 
थोडा पाक बनविण्याकरिता :
  • ८ टीस्पून  बारीक केलेली साखर 
  • १ चूप पाणी 
कृती :
  • सर्वप्रथम एका भांड्यात मैदा घ्या त्यात साखर आणि तूप टाकून पाणी टाकीत एक घट्ट गोळा तयार करा व थोड्या वेळ बाजूला ठेवा . 
  • एका भांड्यात चोकलेट घ्या त्यात पिस्ता  आणि थोडी साखर टाका व चांगले मिक्स करून बाजूला ठेवा 
  • आता तयार कणकीचा गोळा घ्या व त्याचे हव्या त्या आकाराचे तुकडे करा व त्याची पोळी लाटायला घ्या . तयार पोळीचे मधनं दोन भाग करा व एका भागाला हातात घेऊन तिच्या कडांना थोडे पाणी लावीत दोन्ही कडा जोडा व कोण तयार करा. 
  • आता त्यात थोडे चोकलेट  चे मिश्रण भरा मिश्रण भरून दुसरी बाजू हलक्या बोटांनी बंद करा . 
  • एका भांड्यात ८ टीस्पून साखर घ्या व त्यात जवळ जवळ १ कप पाणी टाकून मिश्रण तयार करा . 
  • आत्ता एका प्यान मध्ये तेल गरम करायला ठेवा , तेल गरम झाले कि तयार सामोसे हलके तपकिरी होईपर्यंत टाळून घ्या . 
  • तयार सामोसे साखरेच्या मिश्रणात टाका व चांगले मिक्स करून एका प्लेट मध्ये काढा . 
  • तुमचे चोकलेट सामोसे तयार आहेत . तुम्ही हे केव्हाही चहासोबतसर्व करू शकता . 



Popular Posts

हॅप्पी भाग जएजी हिंदी फिल्म